लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाबद्दल नव्याने अपडेट्स समोर आले आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शिफारस करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला आहे. मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. २७ जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू करण्याची मंत्रिमंडळाची शिफारस राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते, मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली.
चारा छावणी आणि पाणी टंचाईवर देखील बैठकीत निर्णय झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ यांनीही काही सूचना दिल्या असून प्रशासन याकडे लक्ष देणार आहे, असे मुंनगंटीवार यांनी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन बैठकीला उपस्थिती लावली, अशी माहिती देखील मुंनगंटीवार यांनी दिली. जूनपासून अधिवेशन सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता केंद्रीय अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी संसदेच्या अधिवेशनानंतर हे अधिवेशन घेण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
मै नरेंद्र दामोदरदास मोदी… ९ जून रोजी सायंकाळी तिसऱ्यांदा गुंजणार आवाज!
रोहित, हार्दिकच्या खेळीमुळे आयर्लंडवर सफाईदार विजय!
एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार
युगांडाच्या ४३ वर्षीय गोलंदाजाने पहिल्याच वर्ल्डकपमध्ये केला विश्वविक्रम
दरम्यान, सरकारच्या जबादारीतून मुक्त करण्याची इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी ही भूमिका मांडली होती. अशातच आता देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.