आज, ११ ऑगस्टला विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लगार समितीची बैठक पार पडली. यावेळी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित झाली आहे. १७ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत अधिवेशन पार पडणार आहे.
नऊ दिवसांच्या या अधिवेशनाच्या कालावधीत १९ ऑगस्टला दहीहंडीची सुट्टी व २० आणि २१ ऑगस्टला सार्वजानिक सुट्ट्या आहेत. त्यामुळे या दिवशी अधिवेशनाचे कामकाज होणार नाही. विधिमंडळ कामकाजात २४ ऑगस्टला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. आज झालेल्या बैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद व विधानसभा बैठकांची तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली आहे.
ही वाचा:
उरी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट लष्कराने उधळला
जालन्यात ३९० कोटींचं घबाड जप्त, आयकर विभागाची मोठी कारवाई
जेवणाचा डबा घेऊन परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
परवानगी घ्या मग संजय राऊत यांना भेटा!
दरम्यान, विधानभवनात सकाळी विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादा भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.