मोईत्रा यांच्या विरोधात ईडीकडून मनी लाँडरिंगचा गुन्हा

बडतर्फ खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणींमध्ये वाढ

मोईत्रा यांच्या विरोधात ईडीकडून मनी लाँडरिंगचा गुन्हा

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि बडतर्फ खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मोईत्रा यांच्या विरोधात प्रश्नांच्या बदल्यात पैसे मागितल्याप्रकरणी मनी लाँडरिंगचा ईडीने गुन्हा दाखल केला आहे. कॅश फॉर क्वेरी प्रकरणावरील नितीमत्ता समितीचा अहवाल आल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांना लोकसभेतून बडतर्फ करण्यात आले होते. मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या, असा आरोप त्यांच्यावर आहे.

टीएमसी नेते महुआ मोईत्रा पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून आहेत. ममता यांनी त्यांना पश्चिम बंगालमधील कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने दोन दिवसांपूर्वीच महुआ मोईत्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. ईडीने महुआ मोईत्रा यांना चौकशीसाठी दिल्ली कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, समन्सला कोणतेही उत्तर न दिल्यामुळे त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी महुआ मोईत्राची चौकशी होणार आहे.

हे ही वाचा:

“आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला भक्कम बनविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात पाया रचला”

‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी झालेल्या वाहनांचे पैसे काँग्रेसने थकवले

यूपी पोलीस पेपर लीक प्रकरणातील मास्टरमाईंड ताब्यात!

तिबेट क्षेत्राला ६० भौगोलिक नावे जाहीर करा

अशातच बडतर्फ खासदार महुआ मोईत्रा यांना टीएमसीने पुन्हा एकदा कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिली आहे. व्यावसायिक हिरानंदानी यांच्याकडून लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या बदलण्यात पैसे आणि भेटवस्तू स्वीकारल्याबद्दल त्यांना दोषी ठरविण्यात आले होते. व्यावसायिकाने महुआ मोईत्रा यांचे लॉगिन आणि पासवर्ड वापरून अदाणी समूहाच्या विरोधात प्रश्न विचारले. वकील जय अनंत देहाद्री यांनी हे प्रकरण उजेडात आणले. त्यानंतर भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत हा मुद्दा मांडला. महुआ मोईत्रा यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. मी अदाणी समूहाच्या विरोधात प्रश्न विचारला म्हणून मला लक्ष्य केले जात आहे, असेही त्या म्हणाल्या.

Exit mobile version