महाविकास आघाडीचे आणखीन २ नेते तुरुंगात जाणार?

महाविकास आघाडीचे आणखीन २ नेते तुरुंगात जाणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मालिक हे सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. पण आता ठाकरे सरकारमधील आणखीन दोन नेते याच तुरुंगात जाणार असल्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला कारण ठरले आहे मोहित कंबोज यांचे एक सूचक असे ट्विट.

मोहित कंबोज हे गेल्या काही महिन्यांपासून आक्रमकपणे महाविकास आघाडी सरकार विरोधात आवाज उठवत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून ते कायमच नवाब मलिक, संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांना लक्ष्य करत असतात. अशातच आता कंबोज यांनी केलेल्या एका ताज्या ट्विटची चांगलीच चर्चा आहे. बुधवार ३० मार्च रोजी सकाळी कंबोज यांनी हे ट्विट केले आहे.

हे ही वाचा:

कोकण रेल्वेची धमाकेदार कामगिरी! पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक

आदित्य ठाकरे यांच्या सूचनेला बारसू ग्रामस्थांचा विरोध

मोहित कंबोज यांची मागणी; मशिदींवर बेकायदेशीर भोंगे हटवा!

जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर पेट्रोल बॉम्ब हल्ला

मोहित कंबोज त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात म्हणतात की, सुत्रांच्या हवाल्यानुसार अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघेही आर्थर रोड तुरुंगातील १२ क्रमांकाच्या बराकमध्ये एकत्र आहेत. या बराकमध्ये आणखीन दोघा जणांची सोय करण्याची व्यवस्था आहे. तेव्हा बघूया पुढचा नंबर कोणाचा असेल?

कंबोज यांच्या ट्विटमुळे राज्यात चांगलीच चर्चा सुरू झाली असून महाविकास आघाडी सरकारमधील आणखी कोणी नेता अटक होण्याच्या मार्गावर आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. सध्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षातील नेत्यांच्या विरोधात विविध प्रकारचा तपास आणि केसेस सुरू आहेत. यापैकी कोणा नेत्याला लवकरच अटक होऊ शकते का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सध्या शिवसेना नेते यशवंत जाधव यांची जप्त झालेली मालमत्ता, तपास यंत्रणांना सापडलेली त्यांची डायरी, डायरीतला मजकूर या सर्वांची खूपच चर्चा आहे. या सर्व प्रकरणात काही नवे वळण येऊन जाधव यांना अटक होणार का? की इतर कोणी नेता अडकणार त्याबद्दल समाज माध्यमांवर चर्चा रंगली आहे.

Exit mobile version