देशभरातील १० हजार मंदिरांना मोहित कंबोज देणार लाऊडस्पीकर

देशभरातील १० हजार मंदिरांना मोहित कंबोज देणार लाऊडस्पीकर

सर्व हिंदूंना एकत्र आणण्याच्या आणि सनातन धर्माचा प्रचार करण्याच्या कार्यात गुंतलेले भाजपा नेते मोहित कंबोज यांनी हनुमान जयंतीनिमित्त देशभरातील मंदिरांमधून हनुमान चालीसा आणि देवी-देवतांचे भजन-कीर्तन प्रसारित करण्यासाठी लाऊडस्पीकरचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार, १६ एप्रिलपासून वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोहित कंबोज यांनी देवतांच्या भजन- कीर्तन आणि हनुमान चालिसाच्या प्रसारणासाठी मंदिरांमध्ये मोफत लाऊडस्पीकर उपलब्ध करून देण्याची घोषणा केल्यानंतर, देशभरातून मोठ्या संख्येने लोकांनी लाऊडस्पीकरसाठी त्यांच्याकडे अर्ज केले आहेत. आतापर्यंत मोठ्या संख्येने आलेल्या अर्जांपैकी पहिल्या टप्प्यात १० हजार मंदिरांना लाऊडस्पीकर देण्याचा निर्णय मोहित कंबोज यांनी घेतला आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी ५०० मंदिरांमध्ये लाऊडस्पीकर पाठवले जाणार आहेत.

हे ही वाचा:

रणबीर आलियाचा ‘सावरीया’

एलन मस्क ट्विटर खरेदी करणार?

फडणवीसांनी १४ ट्विटस करत केली शरद पवारांची पोलखोल

एनसीबी मुंबई विभागाच्या संचालक पदी अमित घावटे

लाऊडस्पीकरच्या पुरवठ्यासाठी दिल्लीमधील एका कंपनीशी करार करण्यात आला आहे. देशभरातील मंदिरांमध्ये लाऊडस्पीकर पोहचवण्यासाठी म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मोहित कांबेज यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे हिंदूंना या मिशनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version