राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच मलिक, देशमुखांच्या सोबतीला

भाजपा नेते मोहित कंबोज यांनी मंगळवार, १६ ऑगस्ट रोजी खळबळजनक ट्विट्स केली आहेत.

राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच मलिक, देशमुखांच्या सोबतीला

भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) नेते मोहित कंबोज यांनी मंगळवार, १६ ऑगस्ट रोजी खळबळजनक ट्विट्स केली आहेत. या ट्विट्समुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेते लवकरच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे, असं ट्विट त्यांनी केलं आहे. नेत्याचं नाव त्यांनी घेतलं नसून कोणाबद्दल हे ट्विट असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

“ट्विट सेव्ह करून ठेवा. राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक मोठे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहेत,” असं एक ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे.

“२०१९ मध्ये परमबीर सिंह यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा,” असे ट्विट मोहित कंबोज यांनी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅगदेखील केलं आहे

“लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार असून संबंधित नेत्याची भारत आणि परदेशातील मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, प्रेयसींच्या नावावरील संपत्ती, मंत्री म्हणून विविध खात्यांमध्ये केलेला भ्रष्टाचार, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्तेची यादी याबाबत खुलासा करणार आहे,” असं खळबळजनक ट्विट कंबोज यांनी केलं आहे.

हे ही वाचा:

गोविंदाना १० लाखांचे विमा कवच

विरोधी पक्षांना ‘वंदे मातरम’ची ऍलर्जी

बस दरीत कोसळली, ६ जवान शहीद

रश्दी यांच्या सॅटॅनिक व्हर्सेससाठी गुगलवर गर्दी

या ट्विट्सनंतर पत्रकार परिषदेत कोणत्या नेत्याचं नाव उघड होणार याकडे लक्ष असणार आहे. यापूर्वीही महाविकास आघाडी सरकार असताना सरकारमधील मंत्र्यांचे गैरव्यवहार उघडकीस आणताना मोहित कंबोज यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

Exit mobile version