महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नावाब मलिक यांना आज २३ फेब्रुवारी रोजी तब्बल साडे आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली आहे. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मात्र आनंद साजरा केला आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मुंबई येथील प्रसिद्ध व्यावसायिक मोहित कंबोज यांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा आनंद साजरा केला. यावेळी मोहित कंबोज यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे.
मोहित कंबोज यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्ते जमले होते. तेव्हा त्यांनी अअटक केल्यावर मित कंबोज यांना पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयासमोर फटाके फोडत आपला आनंद व्यक्त केला. नवाब मलिक यांना एक क्षणही मंत्रीपदावर ठेवले जाऊ नये, असेही मोहित कंबोज म्हणाले. तुमची जागा आता अनिल देशमुख यांच्या शेजारच्या कोठडीत असल्याचे कंबोज म्हणाले. त्यावेळी समर्थकांसह उभे असताना कंबोज यांनी एक तलवार म्यानातून काढली आणि उंचावली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यावर पोलिस कंबोज यांच्या घरी गेले. तलवार काढून दाखविली म्हणून त्यांच्यावर आता कारवाई करण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
परीक्षा तोंडावर आलेल्या असताना बोर्डाच्या प्रश्नपत्रिका जळून खाक
ईडी कार्यालयातून बाहेर येताना नवाब मलिक आनंदी का होते?
तामिळनाडू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाची जोरदार मुसंडी
‘अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर अनिल परबांचा’
नवाब मलिक यांना आज ईडीने अटक केल्यानंतर भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या गोटात मात्र राजकीय हालचालींना वेग आला असून सर्व राष्ट्रवादीचे नेते हे शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी बैठकीसाठी जमले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवास्थानी देखील बैठक होणार असून नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार का याकडे लक्ष असणार आहे.