30 C
Mumbai
Monday, November 4, 2024
घरराजकारणजावेद भाई और सलीम भाई का मिलन जल्द

जावेद भाई और सलीम भाई का मिलन जल्द

Google News Follow

Related

एकीकडे संपूर्ण देशभर होळीचा उत्साह सुरू असतानाच राज्यात मात्र राजकीय धुळवड पाहायला मिळत आहे. अशातच मोहित कंबोज यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक नवा दावा केला आहे. ‘बुरा ना मानो होली है’ असे म्हणताना त्यांनी ‘जावेद भाई और सलीम भाई का मिलन जल्द’ असे म्हटले आहे. कंबोज यांचे हे ट्विट नवाब मलिक आणि संजय राऊत यांना उद्देशून असल्याचे म्हटले जात आहे.

मोहित कंबोज हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून ते कायमच शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांवर टीका करत असतात. यात प्रामुख्याने त्यांच्या निशाण्यावर नवाब मलिक आणि संजय राऊत हे दोघे असतात. नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग्स केस मध्ये कंबोज यांचे नाव घेतले होते. पत्रकार परिषदेत त्यांनी कंबोज यांच्यावर आरोप केले होते. तेव्हापासून नवाब मलिक आणि संजय राऊत या दोघांच्या मागे कंबोज हात धुवून लागले आहेत.

हे ही वाचा:

… म्हणून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा

शिवसेनेचे सभासद कार्ड, पैसे उकळले मनसेच्या नावाने?

‘काश्मीर फाईल्स’ पोहोचला १०० करोड क्लबमध्ये

‘पावनखिंड’ लवकरच ओटीटी प्लॅटफोर्मवर

शुक्रवार, १७ मार्च रोजी ट्विट करत मोहित कंबोज यांनी लवकरच महाराष्ट्रातील एका मोठा घोटाळ्याचा पर्दाफाश होणार असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होणार असून एक वेगळ्याच प्रकारची कार्यपद्धती समोर येणार आहे. ‘जावेद भाई और सलीम भाई का मिलन जल्द’ असे म्हणताना ‘पिक्चर अभी शुरू हुई है’ असा इशारा दिला आहे.

एकीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकावर तुटून पडले आहेत. त्यांनी आतापर्यंत दोन पेन ड्राइव्ह या अधिवेशनात सादर केले आहे. यामुळे आधीच सरकार अडचणीत आल्याचे दिसत आहे. त्यात आता आणखीन एक प्रकरण बाहेर येत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे राजकीय चर्चा चांगलीच रंगताना दिसत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा