मोहित कंबोज यांची मागणी; मशिदींवर बेकायदेशीर भोंगे हटवा!

मोहित कंबोज यांची मागणी; मशिदींवर बेकायदेशीर भोंगे हटवा!

मुंबई शहरातील मशिदींमध्ये लावलेले बेकायदे भोंगे हटवावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी केली आहे. विशेषतः वांद्रे, वर्सोवा आणि मोहम्मद अली रोड येथील मशिदींवर ही कारवाई करण्यात यावी, असे ते म्हणाले आहेत. या मागणीसंदर्भात एक व्हिडिओ ट्विट करून, ध्वनी प्रदूषणाविरोधात मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नवीन मोहीम हाती घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी शहरातील वाहतूक कोंडी, ध्वनी प्रदूषण आदी प्रश्न सोडवण्यासाठी चांगले उपक्रम सुरू केले आहेत. ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्याला अनुसरूनच मुंबईतील मशिदींवर लावण्यात आलेले बेकायदेशीर भोंगे हटवले पाहिजेत, असे कंबोज म्हणाले आहेत.

दोन दिवसांपूर्वी मुंबई शहरात मशिदींवर लावण्यात आलेले भोंगे हटवले पाहिजेत, अशा मागणीसाठी कंबोज यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ते म्हणाले, जुन्या काळात घड्याळ नव्हते म्हणून मुस्लिम समाजातील लोकांना कळावे नमाज पडण्याची वेळ झाली आहे म्हणून हे भोंगे लावले होते. मात्र आता प्रत्येकाकडे घड्याळ असते त्यामुळे भोंग्यांची काही गरज आहे असे वाटत नाही. याचा अनेक लोकांना, विद्यार्थ्यांना त्रास होतो. त्यामुळे जेवढे बेकायदेशीर भोंगे आहेत ते काढावेत, कंबोज यांनी है स्पष्ट केले की, आम्ही कोणत्याही समाज आणि धर्माविरोधात नाही. अजान झाली पाहिजे, पण ती मशिंदींमध्ये, अशी माझी विनंती आहे, असे कंबोज म्हणाले.

हे ही वाचा:

‘ड्रेनेजचं झाकण ‘त्या’ गायीनेचं बाजूला केलं आणि पडली’

‘शरद पवारांचं आडनाव बदलून आगलावे ठेवा’

हा सायकलचालक म्हणजे ‘मानवनियंत्रित स्कूटर’

राष्ट्रवादीचे नेते मेमन म्हणतात, मोदींच कौतुक करायलाच हवं

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे ध्वनी प्रदूषणाविरोधात चांगले उपक्रम राबवत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी ‘नो टोइंग’ मोहीम राबवली होती.

याबाबत महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे प्रवक्ते ऍड. राजीव के पांडे म्हणाले की, मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी ध्वनिप्रदूषणाविरोधात मोहिम राबविली आहे. मग मशिदींवरील भोंग्यांच्या माध्यमातून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचे काय? असे भोंगे हटवून लोकांना या ध्वनिप्रदूषणापासूनही मुक्त करा.

Exit mobile version