26 C
Mumbai
Saturday, November 9, 2024
घरराजकारणआयुक्तांच्या आशीर्वादाशिवाय ते 'यशवंत' झाले का?

आयुक्तांच्या आशीर्वादाशिवाय ते ‘यशवंत’ झाले का?

Google News Follow

Related

मोहित कंभोज यांचा सवाल

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रकरणासंबंधी मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना आयकर विभागाने नोटीस पाठवण्यात आल्याचे समोर आल्यानंतर भाजपा नेते मोहित कंभोज यांनी इक्बाल सिंग चहल यांच्यावर निशाणा साधला आहे.

यशवंत जाधव यांच्या कटातील किती पैसे इक्बाल चहल यांना मिळाले? असा सवाल मोहित कंभोज यांनी विचारला आहे. कोरोना काळात अनेक चुकीच्या कंपन्यांना काम दिले गेले. हे प्रकरण दाबले गेले आणि एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला.

इक्बाल सिंग चहल यांनी अमेरिकेत मालमत्ता खरेदी केली असून त्याबाबतची माहिती येत्या आठवडाभरात आयकर विभाला देणार असल्याचा गौप्यस्फोट कंबोज यांनी केला. आयकर विभाग केवळ नेत्यांचीच चौकशी का करते? महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार झाला. यशवंत जाधव यांनी अल्पावधीत प्रचंड माया जमा केली. आयुक्तांच्या आशीर्वादाशिवाय ते एवढी माया जमा करू शकतात का? असा सवाल कंभोज यांनी उपस्थित केला. आयुक्त लोकांना नोटीस पाठवतात. मग स्वत: चौकशीला का सामोरे जात नाहीत? असा सवालही कंबोज यांनी केला आहे.

हे ही वाचा:

‘हातोडा’ घेऊन सोमय्या दापोलीकडे निघाले

आजपासून आयपीएलचा रणसंग्राम; चेन्नई, कोलकाता आमनेसामने

उत्तर प्रदेशानंतर आता दापोलीत चालणार बुलडोझर?

‘जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो कायदेश्वर’

ब्लॅकलिस्ट कंपन्यांना कोविड सेंटरचे काम दिले गेले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवला. मात्र, प्रकरण दाबण्याचा प्रकार झाला. त्यावरून यात दाल में कुछ काला है, असे वाटते. भाजपाचे आमदार अमित साटम यांनी त्यावर सातत्याने आवाज उठवला आहे. ‘बीएमसी’ नावाचं पुस्तक अमित साटम प्रकाशित करत आहेत. बीएमसी म्हणजे भ्रष्ट म्युनिसिपल कमिशनर अशा या पुस्तकात मुंबई महापालिकेने गेल्या दोन वर्षात कसा भ्रष्टाचार केला त्याची माहिती देण्यात येणार आहे, असे मोहित कंभोज यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा