लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.या मालीकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, युतीमध्ये असताना उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गात होते. आता मोदी यांच्या नावाने खडे फोडत असून इतक्या झटपट रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिला, अशी जहरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.संदिपान भुमरे हाडाचा कार्यकर्ता असून त्यांना विजयी करा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ही निवडणूक देशाच्या विकासाची प्रगती आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याची आहे.२०१४ नंतर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट करण्याची हिंमत केली नाही. कारण मोदींनी दहशतवाद रोखला आहे.ते पुढे म्हणाले, मोदींकडून ८० कोटी गरिबांना मोफत रेशन देण्यात येत आहे.यामध्ये फक्त हिंदू नाहीयेत तर सर्वजण आहेत.
हे ही वाचा:
‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व’
बेकायदेशीर आयपीएल स्ट्रीमिंग ऍप प्रकरणी सायबर सेलकडून तमन्ना भाटियाला समन्स
पॅलेस्टाइन पाठिंब्याचे, इस्रायलविरोधाचे लोण पसरले अमेरिकेतील विद्यापीठांत
तेलंगणा, आंध्रमधील मुस्लिमांचे आरक्षण निवडणुकीच्या केंद्रस्थानी
आम्हाला मिंधे म्हणतात, नीच म्हणतात, खालच्या भाषेत टीका करतात हे तुम्हाला पसंत आहे का? सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे सहन होत नसल्याने शिवी देण्याचे प्रकार सुरु आहे. हा शेतकरी, कष्टकरी, माता भगिनींचा अपमान आहे. मी या आरोपाला कामाने उत्तर देतो. सूज्ञ मतदार मतपेटीतून उत्तर देऊन उबाठाला घरी बसवतील ही काळ्या दगड्यावरील भगवी रेघ आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, संजय राऊत आणि चंद्रकांत खैरे, विनोद बनकर यांनी दलित बांधवांना स्टेजवरून खाली उतरवले हा दलितांचा अपमान आहे. काँग्रेसने दलित आणि मुस्लिमांचा केवळ व्होटबॅंक म्हणून वापर केला.दलित बांधवानी या अपमानाचा बदला घेऊन महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.