परदेशांतील प्रसारमाध्यमांकडूनही मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक

परदेशांतील प्रसारमाध्यमांकडूनही मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने चारपैकी तीन राज्यांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. या पार्श्वभूमीवर परदेशी प्रसारमाध्यमांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. काहींनी सन २०२४मध्ये भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचे म्हटले असून विरोधी पक्षांच्या आघाडीला हा निकाल म्हणजे धक्का असल्याचे नमूद केले आहे.

हिंदी पट्ट्यात भाजप अजिंक्य

बीबीसीने लिहिले… राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे पंतप्रधान मोदी यांचा लोकसभा निवडणूक जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजप उत्तर आणि मध्य भारत या हिंदीभाषिक पट्ट्यात अजिंक्य राहिला आहे. रविवारच्या निकालांमुळे मोदी यांचा उत्साह वाढला आहे, जे स्वतःच्या तिसऱ्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाकडे डोळे लावून बसले आहेत. काँग्रेसच्या हातातून राजस्थान निसटणे चिंताजनक आहे.

मोदींचे तिसऱ्या कार्यकाळाकडे लक्ष

अलजजीरा म्हणते… चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांचा कौल काय आहे, हे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळाकडे आहे. काँग्रेसला केवळ तेलंगणमध्येच समाधान मानावे लागले. राजस्थानमध्येही ते स्वतःचे सरकार वाचवू शकले नाहीत. २८ विरोधी पक्षांची ‘इंडिया’आघाडी राष्ट्रीय स्तरावर भाजपला पराभूत करू शकेल?

भाजप पुन्हा विरोधी पक्षांना मात देण्यासाठी सज्ज

ब्लूमबर्गने लिहिले… भारताने तीन प्रमुख राज्यांमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीत पुन्हा जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. मतदार पंतप्रधान मोदी यांनाच पाठिंबा देतात, हेच यावरून अधोरेखित झाले आहे.

उत्तर भारतात विरोधी पक्ष नेस्तनाबूत

फायनान्शिअल टाइम्सने लिहिले… पंतप्रधान मोदी यांच्या भाजपने राज्याच्या निवडणुकीत शानदार विजय मिळवला. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांची पकड आणखी घट्ट झाली आहे. या निकालामुळे उत्तर भारतात विरोधी पक्ष नेस्तनाबूत झाला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या प्रयत्नांना धक्का मिळेल.

हे ही वाचा:

मोदींवरील विश्वासाचं हे यश!

तीन राज्यांत काँग्रेसचा चिखल, भाजपाचे कमळ फुलले !

आता मन मन मे मोदी…

मध्यप्रदेशमध्ये लाडली योजनेचा प्रभाव

भारत जोडो यात्रेची जादू चालली नाही

नेपाळचे प्रमुख वर्तमानपत्र कांतिपूरने लिहिले… काँग्रेसनेता राहुल गांधी यांची भारतजोडो यात्रा आणि अन्य प्रयत्नांची जादू हिंदीभाषिक राज्यांवर चालली नाही. भाजपच्या विजयामुळे पक्ष आणखी मजबूत झाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कल्याणकारी योजना लोकांना पसंत पडत आहेत.

Exit mobile version