26 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारणमोदींच्या घोषणेने ग्लोबल टेंडरची हवाच काढली

मोदींच्या घोषणेने ग्लोबल टेंडरची हवाच काढली

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व वयोगटाच्या नागरिकांना मोफत लस देण्याचा घेतलेला निर्णय हा क्रांतिकारी असल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. आम्हाला लस विकत घेण्याची परवानगी द्या, अशी मागणी अनेक राज्य करत होती. त्यानुसार दीड महिन्यांपूर्वी तशी परवानगी दिली होती. मात्र, त्यानंतर महाराष्ट्र सरकारने लसीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा गाजावाजा करण्यापलीकडे काहीच केले नाही. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा करुन हा विषयच संपवून टाकला आहे, असे प्रविण दरेकर यांनी सांगितले.

प्रविण दरेकर यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोफत लसीकरणाच्या मोदींच्या निर्णयाचे कौतुक केले. राज्यांकडून लसपुरवठ्यासंदर्भात आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाही पंतप्रधान मोदी शांतपणे काम करत होते. अखेर सोमवारी त्यांनी केंद्र सरकारच सर्व लसी पुरवेल, असा निर्णय घेतला. यावरुन पंतप्रधान मोदी संवेदनशीलपणे काम करत असल्याचे स्पष्ट होते, असे दरेकर यांनी सांगितले.

हे ही वाचा:

२० जुलैला जेफ बेझोस अंतराळात झेप घेणार

केमिकल कंपनीत काल, तर आज गोडाऊनने पेट घेतला

नव्या कोरोना रुग्णांची संख्या लाखापेक्षा कमी

समन्वय प्रतिष्ठानमार्फत ३००० ठाणेकरांचे लसीकरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना भेटताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलवायला हवे होते. त्यामुळे मदत झाली असती. सत्ताधाऱ्यांना अहंकार असता कामा नये. उद्धव ठाकरे हे आपल्या कोर्टातील मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात ढकलण्यासाठी ही भेट घेत असतील तर या भेटीमधून काहीही साध्य होणार नाही. आरक्षणावर सांगोपांग चर्चा करून समन्वय असला पाहिजे. केवळ जाऊन भेट घेण्यात अर्थ नाही.राज्यपालांना पत्रं दिलं पंतप्रधानांना भेटलं म्हणजे काम संपलं असं असेल तर त्याला अर्थ नाही, असेही प्रविण दरेकर यांनी म्हटले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा