भाजपा नेते आणि पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली आहे की, दुर्गा पूजा पंडाल आणि शेजारील देशातील विविध मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंना मदत देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. सुवेंदू अधिकारी यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कुख्यात इस्लामिक गुंड बांगलादेशातील ‘सनातनी’ अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य करण्याची जुनी परंपरा आहे.
“यावेळी धार्मिक कट्टरपंथी अनेक दुर्गापूजा पंडाल आणि विविध मंदिरांची तोडफोड करण्यासाठी रस्त्यावर उतरले. सध्या बांगलादेशात राहणाऱ्या सनातनी लोकांची स्थिती अतिशय दयनीय आहे. ” असं अधिकारी म्हणाले.
बांग्लादेशच्या चित्तगाँव विभागातील कुमिल्ला या शहरामध्ये कुराणची कथित विटंबना केल्यावर दुर्गा पूजा पंडालवर इस्लामिक गुंडांनी हिंसक हल्ला केला. चांदपूरच्या हाजीगंज, चॅटोग्रामच्या बांशखली आणि कॉक्सबाजारच्या पेकुआ येथील हिंदू मंदिरांमध्येही तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. ढाका ट्रिब्यून वृत्तपत्राने असे वृत्त दिले की एका टप्प्यावर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि अनेक दुर्गा पूजेच्या ठिकाणी हिंदूंवर हल्ल्याच्या घटना वाढू लागल्या. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केल्यामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांवर हल्ला झाला, असे त्यात म्हटले आहे.
हे ही वाचा:
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेविरोधात हिंदूंवर इस्लामिक हल्ले
अमित शाह म्हणाले पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू
लसीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था सुसाट: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
बापरे! कोणी केली धनुष्यबाण घेऊन हत्या?
डेली स्टार वृत्तपत्राने म्हटले आहे की, कुमिल्ला येथील घटनेनंतर चांदपूरच्या हाजीगंज उपजिल्ह्यात जमाव आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्याने बुधवारी किमान तीन जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले.