येणार तर ‘नरेंद्र मोदीचं’; नितीन गडकरी यांची ‘भविष्यवाणी’ !

मध्यप्रदेशसह राजस्थान मध्येही भाजपचं येणार असल्याचा दावा

येणार तर ‘नरेंद्र मोदीचं’; नितीन गडकरी यांची ‘भविष्यवाणी’ !

‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी’ यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत भाष्य केले आहे.राजकीय बाबींमध्ये स्पष्ट वक्ते आणि रोडकरी म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाकीत केले आहे की, ‘२०२४ मध्ये भाजपा पार्टी’  मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये पूर्वीपेक्षा जास्त जागांसह सत्तेवर परत येईल. एएनआयशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ३०० हुन अधिक जागा मिळवून बहुमतात सरकार स्थापन केले होते. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीबाबत नितीन गडकरी यांनीही येथे भाजपचाच विजय होणार असल्यास सांगितले.मात्र, तेलंगणाच्या निवडणुकीबाबत त्यांनी असा कोणताही दावा केला नाही.

पुढे म्हणाले की,भाजपा एक मजबूत पार्टी म्हणून आम्ही मैदानात उतरू आणि पहिल्यापेक्षा आमची जास्त ताकद असेल, एएनआयशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले. लोकसभा निवडणुकीत आम्हाला पूर्वी मिळालेल्या जागांपेक्षा जास्त जागा मिळतील. आम्ही देशाचे भविष्य सुधारले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जनता आम्हाला पुन्हा विजयी करणार ,असल्याचे गडकरी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्र्यांनी मोफत विजेसह मोफत योजनाही दिल्या आहेत.मात्र ते चुकीचे असल्याचे गडकरी म्हणाले. मोफत विजेमुळे वीज कंपन्यांच्या १८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, हे असेच चालू राहिले तर आपले ऊर्जा क्षेत्र संपुष्टात येईल, ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा:

पिकनिकला गेलेल्यांची कार पडली ३० फूट खड्ड्यात; तिघे दगावले!

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला मनसेचा विरोध !

सदाशिव पेठेतील कोयता हल्ल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचारी निलंबित

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न, अहमदनगरचे काळे दाम्पत्य मानाचे वारकरी

निवडणुका जिंकायच्या असतील तर गरिबांसाठी घरे आणि त्यांना रोजगार द्या. आपण लोकांना एखादी गोष्ट फुकटात दिली तर त्याचे महत्त्व कमी होते. हे मोफतचे राजकारण लोकशाहीसाठी घातक आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.पुढे म्हणाले, लोक सुशिक्षित आहेत आणि त्यांनी कोणाला मत द्यायचे हे माहित आहे. भारतातील लोकशाही धोक्यात आल्याचे विरोधी पक्ष आणि परदेशी माध्यमांकडून सांगण्यात आल्यावर नितीन गडकरी म्हणाले की, तसे नाही कोणतीही व्यवस्था स्वतःच्या कायद्याने चालते ,जेव्हा काही लोक कायद्यापुढे अपयशी ठरतात तेव्हा हे विरोधक असे आरोप करतात.जे काम काँग्रेसने ६० वर्षात केले नव्हते ते काम आम्ही ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ यांच्या नेतृत्वाखाली १० वर्षात केले आहे, असे ते म्हणाले.

गीता प्रेसला, ‘गांधी शांतता पुरस्कार’ देण्याबाबत काँग्रेसच्या टिप्पणीवरील नितीन गडकरी यांनी आक्षेप घेतला ते म्हणाले अशी विधाने करून काँग्रेसची अशी बिकट अवस्था झाली आहे, ते म्हणाले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, गांधीजींची गीतेवर खूप श्रद्धा होती आणि गीता प्रेसने तिच्या प्रचारासाठी अप्रतिम काम केले आहे.म्हणूनच गीता प्रेस विरुद्ध चुकीचे बोलणे म्हणजे गांधींच्या विचारसरणी विरुद्ध बोलण्यासारखे आहे, असे गडकरी म्हणाले.

Exit mobile version