भाजपा खासदारांना मोदी का म्हणाले, स्वतःला बदला नाहीतर…?

भाजपा खासदारांना मोदी का म्हणाले, स्वतःला बदला नाहीतर…?

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संसदीय बैठकीत अनुपस्थितीत खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. ते म्हणाले, “तुम्ही स्वतःला बदला नाहीतर आम्ही बदलू. शिस्तीत राहा, वेळेवर या आणि तुमची पाळी आल्यावरच बोला, मुलांसारखे वागू नका असे कडक शब्दात पंतप्रधानांनी खासदारांना सुनावले आहे.

संसदेच्या कामकाजात आणि सभांमध्ये नियमित राहून जनतेच्या हितासाठी काम करण्याचा सल्ला मोदींनी दिला आहे. खासदारांच्या अनुपस्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना मोदी हे ही म्हणाले की, तीच गोष्ट मुलांना पुन्हा पुन्हा समजावून सांगितली तर त्यांनाही समजते. कृपया बदल घडवून आणा. नाहीतर बदल आपोआप होईल.

या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. खासदारांना सूर्यनमस्कार करण्याचा सल्लाही मोदींनी दिला. ते म्हणाले की, तुम्ही सर्वांनी सूर्यनमस्कार घाला, यामुळे तुम्ही सर्व निरोगी राहाल.

तत्पूर्वी, बैठक सुरू असताना पंतप्रधान मोदीनी, १५ नोव्हेंबर (बिरसा मुंडा यांचा वाढदिवस) हा ‘ आदिवासी गौरव दिवस ‘ म्हणून घोषित केला. त्याबद्दल त्यांचा सन्मानही करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या मंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी त्यांनाही काही धडे दिले. काय करावे आणि काय करू नये हे मंत्र्यांना त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

…त्या बाळाचे पालक आता मुंबईच्या महापौर!

शिवसेनेचे यूपीएच्या दिशेने पहिले पाऊल

नवाब मलिक यांना न्यायालयाने फटकारले

केरळमध्ये ‘मैं बाबरी हूँ’ बिल्ले वाटून मुलांमध्ये पसरवत आहेत द्वेष

 

पंतप्रधानांनी मंत्र्यांना मीडियामध्ये अनावश्यक वक्तव्ये करू नका, असा सल्लाही दिला . तुमच्या चेहरा नव्हे, तर तुमचे काम चमकले पाहिजे, असे त्यांनी मंत्र्यांना सुनावले. जनतेच्या हितासाठीच फक्त काम करा. त्याचबरोबर सर्व मंत्र्यांना सकाळी साडेनऊ वाजता कार्यालयात येण्याचा आदेश दिला आहे.

Exit mobile version