वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील लस उत्पादकांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहे. काही ठरावीक लोकांशीच करत असलेली मोदींची ही तिसरी बैठक आहे. काल नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर आणि औषध कंपन्यांशी संवाद साधला होता.
देशात कोविड वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी भारताने लसीकरणाचा परीघ वाढवायला सुरूवात केली आहे. त्यानुसार आता १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना सरसकट लस देण्यात येणार आहे. आज संध्याकाळी ६ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लस उत्पादकांसोबत संवाद साधणार आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे.
हे ही वाचा:
ड्रायव्हर गेले गावाला, ऑक्सिजन देऊ कसा तुम्हाला!
रुग्णवाढीत नोंदली गेली किंचित घट
कालच मोदी सरकारकडून देशातीलच नव्हे तर जगातील अग्रणी लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाला लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी तीन हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्याचे मंजूर केले. त्याबरोबरच दुसरी लस उत्पादक कंपनी, भारत बायोटेकला देखील पंधराशे कोटी रुपयांचे अर्थसहाय्य याच कारणासाठी मंजूर करण्यात आले.
भारताने आपल्या लसीकरण मोहीमेला १६ जानेवारी पासून सुरूवात केली. १० कोटी नागरिकांना केवळ ८५ दिवसात लस देऊन ही संख्या सर्वात वेगाने गाठणारा भारत हा पहिला देश ठरला. भारताची लसीकरण मोहीम सिरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसींवर आधारित आहे. त्याबरोबरच आता लवकरच स्पुतनिक-५ ही रशियाची लस देखील लवकरच दाखल होणार आहे. त्याव्यतिरिक्त आणखी चार लसींचा मार्ग देखील भारत सरकारने सुलभ केला आहे.