देशातील एकूण पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरी या राज्यांचा समावेश आहे. यापैकी आसाम आणि पश्चिम बंगालमधील मतदानाला सुरूवात झाली आहे तर केरळ, पुदुचेरी आणि तमिळनाडू या राज्यात ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरी या तिनही ठिकाणी सभेला संबोधित करणार आहेत.
हे ही वाचा:
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ताजिकिस्तान भेटीवर
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया होण्याची शक्यता
सोमवारी महाराष्ट्रात आढळले ३१,६४३ नवे कोरोना रुग्ण
पुदुचेरीमध्ये ३० जागांसाठीची निवडणुक ६ एप्रिल रोजी होणार आहे. हे मतदान एका टप्प्यात पार पडणार आहे. निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुदुचेरीला ही दुसरी भेट आहे. यापूर्वी मोदींनी २५ फेब्रुवारी रोजी भेट दिली होती. यावेळी बोलताना मोदींनी विविध केंद्रीय योजनांची माहिती दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी एनडीएसाठी प्रचारसभेत बोलणार आहेत. ही सभा एएफटी थायडल याठिकाणी होणार आहे. एआयएनआरसी हा पुदुचेरीतील एनडीएचा मुख्य पक्ष आहे. हा पक्ष ३० पैकी १६ जागांवर निवडणुक लढवणार आहे तर भाजपा ९ जागांवर निवडणुक लढवणार आहे आणि एआयएडीएमके पाच जागांवर लढणार आहे.
आज मोदींच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुदुचेरीत ड्रोन उडवण्यास मनाई करण्याता आली आहे. जिल्हाधिकारी पुर्वा गर्ग यांनी काढलेल्या आदेशानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे आज पुदुचेरीत भारतीय दंडविधान संहितेचे कलम १४४ देखील पुकारण्यात आले आहे.