मोदींचे मंदिर रातोरात हटवले

मोदींचे मंदिर रातोरात हटवले

भारत देश हा पहिल्यापासूनच व्यक्तीपूजक राहिलेला आहे. भारतात अनेक व्यक्तींना त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर पूजनीय स्थान दिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील अशाच प्रेमातून एक मंदिर उभे राहिले. पुण्याच्या औंध भागामध्ये एका भाजपा कार्यकर्त्याने स्वतःच्या खासगी जमिनीवर हे मंदिर उभारले होते.

पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने मोदींवरील प्रेमापोटी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचं मंदिर उभारलं होतं. हे मोदी मंदिर आता हटविण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून कानपिचक्या मिळाल्यानंतर हे मंदिर हटविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या मंदिरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा शेजारील नगरसेवकाच्या कार्यालयात हलविण्यात आला आहे.

हे ही वाचा:

काश्मिरला बसला भूकंपाचा धक्का

आता हिंदू धर्माविषयी शिका आणि पदवी मिळवा

नुसती माणसेच नाही तर श्वानही सुखरूप परत आणले

ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने का झापले?

पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारले होते. पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूरमधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला आहे. याकरिता १ लाख ६० हजार रुपये खर्च करण्यात आला होता. १५ ऑगस्ट २०२१ दिवशी औंधमधील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते.

मंदिरासमोर मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता मोदी समर्थकांकरिता लावण्यात आली होती. मंदिराबाहेर असलेल्या, फलकावर आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख देखील या कवितेच्या आधारे मांडण्यात आली होती. या मंदिरावरून मला विरोधकांनी ट्रोल केलं तरी चालेल, पण मोदींकडून आपल्याला प्रेरणा मिळते. त्याकरिता हे मंदीर उभारले असल्याचे मयूर मुंढेनी म्हटलं होतं.

Exit mobile version