‘द केरळ स्टोरी’ला विरोध म्हणजेच काँग्रेसचे दहशतवादाला समर्थन

नरेंद्र मोदी यांनी बल्लारीतील भाषणात काँग्रेसवर केला घणाघात

‘द केरळ स्टोरी’ला विरोध म्हणजेच काँग्रेसचे दहशतवादाला समर्थन

द केरळ स्टोरी हा बहुचर्चित चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल देशभरात चर्चा सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाची विशेष दखल घेतली आहे. कर्नाटक येथे निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी यांनी चित्रपटाबाबत भाष्य केले आहे. कर्नाटकात बल्लारी येथील सभेत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, द केरळ स्टोरीने दहशतवादाचे एक बीभत्स रूप दाखविले आहे. दहशतवाद्यांच्या कटकारस्थानांना उघड केले आहे. पंतप्रधान त्यात म्हणाले की, काँग्रेस या चित्रपटाला विरोध करत आहे आणि दहशतवादी प्रवृत्तीच्या पाठीशी उभी राहात आहे. व्होट बँकसाठी काँग्रेसने दहशतवादाचा बचाव केला आहे.

मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, गेल्या काही वर्षात दहशतवादाचे हे नवे भयानक स्वरूप दिसले आहे. बॉम्ब, बंदुक आणि पिस्तुलाचे आवाज तर ऐकू येतात पण समाजात आतून पोखरण्याच्या कारस्थानाचा कोणताही आवाज नसतो. न्यायालयानेही दहशतवादाच्या या स्वरूपावर चिंता व्यक्त केली आहे.

अशाच कटकारस्थानांवर आधारित द केरळ स्टोरीची सध्या खूप चर्चा आहे. म्हणतात की, एक राज्यात झालेल्या दहशतवाद्यांच्या कारस्थानांवर आधारित हा चित्रपट आहे. देशातील एक सुंदर राज्य, प्रतिभाशाली लोक तिथे राहतात तिथे दहशतवादाच्या सुरू असलेल्या कारस्थानांचा खुलासा करण्यात आला आहे. देशाचे दुर्भाग्य बघा,  काँग्रेस या दहशतवादी प्रवृत्तीच्या सोबत उभी राहिली आहे. कर्नाटकच्या लोकांनी काँग्रेसपासून सावधान राहायला हवे.

त्याआधी, सकाळी केरळ उच्च न्यायालयाने केरळ स्टोरी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती घालण्यात यावी ही याचिका फेटाळली. न्यायालयाने म्हटले की, केरळचा धर्मनिरपेक्ष समाज या चित्रपटाला स्वीकारेल. न्यायालयाने याचिकादाराना विचारले की, या चित्रपटामुळे समाजात गोंधळ निर्माण होईल, असे तुम्हाला का वाटते. हा चित्रपट एका कथेवर आधारलेला आहे, इतिहास नाही.

हे ही वाचा:

सुदानमधून ३,८०० भारतीय सुखरूप मायदेशी परतले 

टिपू सुलतानच्या अत्याचारांचे वास्तव दर्शन; लवकरच येतोय ‘टिपू’

दिलासा.. कोरोनाची उतरती भाजणी सुरु

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना जामीन नाही

न्यायालय म्हणाले की, या चित्रपटात आक्षेपार्ह असे काय आहे? अल्ला हा एकमेव देव आहे हे सांगितले असेल तर त्याला वाईट काय आहे? आपल्या देशात नागरिकांना आपापल्या देवांची पूजा करण्याचा आपल्या धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काय आक्षेपार्ह वाटले?

न्यायालयाने मुद्दा उपस्थित केला की, अशा प्रकारच्या अनेक फिल्म यापूर्वी बनल्या आहेत. हिंदू पंडित, ख्रिश्चन पादरी यांच्याबाबतही चित्रपटात विरोधी चित्रण करण्यात आले आहे. हे एक काल्पनिक चित्र आहे असे तुम्हाला वाटत नाही का? त्यामुळे या चित्रपटात असे काय वेगळे वाटले? त्यामुळे या चित्रपटामुळे समाजात तेढ निर्माण कशी होईल, हे सांगा.

Exit mobile version