जुन्या संसद भवनाला ‘संविधान सदन’ असे नामकरण करण्याची सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

जुन्या संसद भवनाला ‘संविधान सदन’ असे नामकरण करण्याची सूचना

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सर्व सदस्यांसह नव्या संसद भवनात प्रवेश केला. त्याआधी त्यांनी जुन्या संसद भवनाला संविधान सदन असे नामकरण करण्याची सूचना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या संसदभवनाला केवळ जुने संसदभवन असे बोलणे योग्य ठरणार नाही. कारण याच इमारतीत गेली ७५ वर्षे विविध सत्रांचे आयोजन केले गेले आहे. त्यामुळे त्याला नवे नामकरण केले गेले पाहिजे.

 

 

पंतप्रधान म्हणाले की, या इमारतीला संविधान सदन असे नामकरण केल्यामुळे ज्यांनी या संसदभवनात इतिहास घडविला त्यांना एकप्रकारची आदरांजली ठरेल. हा इतिहास पुढच्या पिढ्यांना सोपविण्याची ही संधी आपण सोडता कामा नये. नव्या संसद भवनात प्रवेश करण्याआधी नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हे वक्तव्य केले. गणेश चतुर्थीच्या पावन समयी हा नव्या संसदभवनातील प्रवेश करण्यात आला.

हे ही वाचा:

खलिस्तानी अतिरेक्याच्या हत्येसंदर्भात कॅनडाने केलेल्या वक्तव्याचा भारताने केला धिक्कार

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? सुनावणी लांबणीवर

जनमानसातील आत्मविश्वासाचा विकासच … विकसित भारत घडवेल

महाराष्ट्रात ‘शांतता’ आणि ‘सलोखा’ हाच त्या बैठकीचा अजेंडा…

 

मोदींचे भाषण झाल्यानंतर सर्व सदस्यांनी नव्या संसद भवनाकडे कूच केले. सर्व खासदांना यानिमित्ताने भेट देण्यात आली. त्या बॅगमध्ये संविधानाची प्रत, संसदेसंदर्भातील पुस्तके, या घटनेचे स्मरण म्हणून एक नाणे आणि स्टॅम्प अशा वस्तू होत्या. नव्या संसद भवनात प्रवेश करताना तेथे आणखी एक बदल झाला तो म्हणजे तेथील कर्मचाऱ्यांच्या गणवेशात बदल झाला. दोन्ही संसद भवनात आता नव्या गणवेशातील कर्मचारी दिसतील. आता विशेष सत्रादरम्यान नवा गणवेश घातलेले कर्मचारी दिसणार आहेत.

Exit mobile version