भारतमातेची हत्या शब्दप्रयोगावरून मोदींनी काँग्रेसला सुनावले; कच्छतिवूची केली आठवण

लोकसभेत अविश्वास ठरावाला उत्तर देताना केला हल्लाबोल

भारतमातेची हत्या शब्दप्रयोगावरून मोदींनी काँग्रेसला सुनावले; कच्छतिवूची केली आठवण

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर केलेल्या भाषणात मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली आहे, असे विधान केले होते त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार घणाघात करत काँग्रेसला सुनावले. ते म्हणाले की, १४ ऑगस्ट फाळणीचा दिवस आजही आमच्यासमोर दिसतो. यांनी भारताचे तीन तुकडे केले. गुलामीच्या साखळदंडातून मुक्त करायचे होते तेव्हा या लोकांनी भारतमातेच्या भुजाच कापल्या. कोणत्या तोंडाने बोलण्याची हिंमत करतात. हे तेच लोक आहेत ज्या वंदे मातरम गीताने देशासाठी मरण्याची प्रेरणा दिली, चेतनेचा स्वर बनला. तुष्टीकरणासाठी तुकडेच केले नाहीत वंदे मातरमचेही तुकडे केले. भारत तेरे टुकडे होंगे हे नारे लावणारे लोक यांना प्रोत्साहन देतात. त्यांची मदत करतात सिलिगुडी जवळचा कॉरिडोर आहे त्याला कापून टाकू. हे स्वप्न पाहणाऱ्याचे जे समर्थन देतात. कच्छतिवू काय आहे? कच्छतिबू कुपठे आहे. डीएमकेचे लोक मला पत्र लिहितात की, मोदीजी कच्छतिबू परत घेऊन या. कोणी केला. तामिळनाडूपढे एक बेट आहे. त्यालाही तोडले. कोण होते त्यावेळेला. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली झाले होते. एक सत्य दुःखाने सांगू इच्छितो की, हे तो लोक समजू शकत नाहीत. माझे भावनिक नाते आहे. मी काही प्रसंग तुमच्यासमोर ठेवू इच्छितो–

 

एक म्हणजे ५ मार्च १९६६. या दिवशी काँग्रेसने मिझोराममध्ये असहाय्य नागरिकांवर वायूसेनाच्या माध्यमातून हल्ला करविला होता. गंभीर विवाद झाला. दुसऱ्या देशाची वायूसेना होती का, त्यांची सुरक्षा भारत सरकारची जबाबदारी होती की नाही? १९६६साल होते ते. निर्दोष नागरिकांवर हल्ला केला. आजही मिझोराममध्ये ५ मार्चला शोक केला जातो. लोकांचे घाव भरण्याचा प्रयासही नाही केला. काँग्रेसने हे सत्य लपवले आहे. आपल्याच देशात वायूसेनेच्या माध्यमातून हल्ला केला. इंदिरा गांधी हेत्या तेव्हा. अकाल तख्तवर हल्ला झाला. आणि इथए आम्हाला उपदेश देतात. इशान्य भारतात लोकांच्या विश्वासाची हत्या केली.

 

 

दुसरी घटना म्हणजे १९६२ची घटना. रेडिओ प्रसारण आजही शूलासारखी इशान्य भारताच्या लोकांना टोचत आहे. १९६२मध्ये चीनचा हल्ला सुरू होता. दिल्लीच्या शासनात असलेल्या पंडित नेहरूंनी काय सांगितले होते. माय हार्ट गोज आऊट ऑफ आसाम. ते प्रसारण आजही आसाममधील लोकांना टोचत असते. जे लोक आपल्या स्वतःला लोहियांचा वारस म्हणवतात. लोहियांनी नेहरूंवर गंभीर आरोप केले. नेहरू नॉर्थ इस्टचा विकास करत नाहीत.

 

 

इशान्य भारत आमच्या काळजाचा तुकडा

मोदी म्हणाले की, इशान्य भारताप्रती माझे समर्पण आहे. काँग्रेसचा कारभार निवडणुकीभोवती असते. नॉर्थ इस्टला त्यांचा प्रयत्न राहिला की, जिथे एक दोन जागा असतील तिथे त्यांना फारसा रस नव्हता. त्याकडे लक्ष नव्हते. देशाच्या नागरिकांप्रती संवेदना नव्हती. त्यांच्याप्रती सावत्र वागणूक हा काँग्रेसच्या डीएनएत आहे. ९ वर्षांच्या प्रयत्नातून सांगतो की, इशान्य भारत आमच्या काळजाचा तुकडा आहे.

हे ही वाचा:

देशाची माफी मागा! विरोधकांवर ज्योतिरादित्यांचा घणाघात

बीडमध्ये सिगारेटचे पाकीट महाग दिल्याने हॉटेलवर गोळीबार !

इस्रोचे लक्ष चंद्राच्या कक्षेतील ‘ट्रॅफिक’कडे

ज्ञानव्यापी मशीद परिसर सर्वेक्षणाच्या मीडिया कव्हरेजवर बंदी

 

मणिपूरच्या समस्येची जननी काँग्रेस

मोदी म्हणाले की, मणिपूरच्या समस्येला असे दाखवले जात आहे, जसे काही वर्षात ही परिस्थिती निर्माण झाली. अमितभाईंनी विस्ताराने सांगितले. पण गंभीरपणे सांगू इच्छितो या समस्येची जननी काँग्रेस आहे. त्यांचे राजकारण जबाबदार आहे. भारतीय संस्कारांनी ओतप्रोत भरलेले मणिपूर, स्वातंत्र्यचळवळीत बलिदान देणारा मणिपूर काँग्रेसच्या शासनात विभाजनाचा बळी ठरला. काऱण मणिपूरात प्रत्येक व्यवस्था आतंकवाद्यांच्या मर्जीने होत असे. सरकार कुणाचे होते तर काँग्रेसचे. सरकारी कार्यालयात महात्मा गांधींचा फोटो लावू दिला जात नसे. आझाद हिंद फौज संग्रहालयात बॉम्ब फेकला तेव्हा सरकार काँग्रेसचे होते. मणिपूरमध्ये राष्ट्रगीत गाऊ दिले जात नसे. लायब्ररीतील पुस्तके जाळण्याचा प्रकार घडला तेव्हा काँग्रेसचे सरकार होते. मंदिराची घंटा बंद होत असे सेना बोलावली जात असे तेव्हा काँग्रेसचे सरकार होते. श्रद्धाळूंचा जीव घेतला गेला तेव्हा काँग्रेसचे सरकार होते. आयपीएस आयएएसच्या वेतनातील हिस्सा आतंकवाद्यांना द्यावा लागत होता तेव्हा काँग्रेसचे सरकार होते. त्यांची सिलेक्टिव्ह संवेदना आहे.

Exit mobile version