भाजपने हरयाणात मिळवलेल्या विजयाचा हुंकार देशभरात ऐकायला मिळेल. आजच्या या पवित्र दिवशी हरयाणात कमळ फुलले आहे. हा विजय म्हणजे सत्य, विकास आणि उत्तम प्रशासन यांचा विजय आहे, अशा शब्दात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरयाणातील विजयाचे विश्लेषण केले आणि आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.
हरयाणाचे निकाल भाजपच्या बाजूने लागल्यानंतर दिल्लीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदींनी विजयाचा अर्थ समजावून सांगितला. मोदी म्हणाले की, भारताच्या लोकशाहीला, अर्थकारणाला, समाजव्यवस्थेला नख लावण्याचे कारस्थान जागतिक स्तरावर सुरू आहे. काँग्रेस आणि त्यांचे सहकारी यात सामील आहेत.
हे ही वाचा:
‘राहुल गांधीच्या जिंकण्यासाठी प्रचंड थापा, पण हाती माती अन तोंडही झाले काळे’
जीएसटी फसवणूक प्रकरणात ज्येष्ठ पत्रकार महेश लांगा यांना अटक
जम्मू-काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला हे महत्त्वाचं नसून लोकशाही जिंकली हे महत्त्वाचं
तुतारी पक्ष मुस्लीम लीगचा पार्टनर आहे का?
भारतीय जनता पार्टी हरयाणात आता सरकार स्थापनेच्या तयारीला लागले आहे. ९० पैकी ४८ जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला ३७ जागांवर यश मिळाले आहे.
मोदींनी हा विजय प्रत्येक वर्गाचा, प्रत्येक जातीजमातीचा असल्याचे म्हटले आहे.
मोदी म्हणाले की, सत्ता हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचे काँग्रेसला वाटते आणि त्यामुळे सत्तेशिवाय आपल्याला राहता येणार नाही असा त्यांचा समज आहे. सत्तेत नसले की त्यांची स्थिती पाण्याविना तडफडणाऱ्या माशासारखी होते. पण ही सत्ता मिळवण्यासाठी ते देशालाही पणाला लावू शकतात. देशापेक्षा ते स्वहिताला महत्त्व देतात.