छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल सध्या चर्चेत आहेत ते बेटिंग ऍपकडून मिळालेल्या कथित ५०८ कोटी रुपयांमुळे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर कडवट टीका केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने इथे प्रचाराला आलेले असताना मोदी यांनी बघेल यांचा हा विषय उचलून धरला. निवडणूकीसाठी महादेव बेटिंग ऍपकडून पैसे घेतल्याचा आरोप करत मोदींनी काँग्रेसच्या राजकारणावर आसूड ओढले.
हे ही वाचा:
उद्योगपती अबानींना धमकी देणारा अखेर अटकेत
विदर्भ, मराठवाड्यातील दुग्धविकास प्रकल्पांतून ३ लाख रोजगार निर्मिती
मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या योजना प्रभावीपणे राबवा!
मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या योजना प्रभावीपणे राबवा!
महादेव ऍपच्या प्रमोटर्सकडून निवडणुकीसाठी पैसे मिळाल्याचा काँग्रेसवर आरोप आहे.
ते म्हणाले की, लोकांना लुटण्याची एकही संधी काँग्रेस सोडत नाही. त्यांनी तर ‘महादेव’लाही सोडले नाही. रायपूरमध्ये टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणावर बेटिंगचा, जुगाराचा पैसा सापडला. काँग्रेस नेते आपली घरे अशा पैशाने भरत आहेत. त्याच्या तारा कुठे जोडल्या जात आहेत ते तुम्ही पहातच आहात. छत्तीसगडच्या मुख्यमंत्री आणि नेत्यांनी लोकांना सांगायला हवे की दुबईत बसलेल्या लोकांशी त्यांचा संबंध काय आहे?
मोदी म्हणाले की, भाजपचा हा इतिहास आहे की जे आश्वासन दिले जाते ते पूर्ण केले जाते. छत्तीसगड हे भाजपने तयार केलेले राज्य आहे आणि हाच पक्ष त्याची उत्तम उभारणी करू शकतो. भाजपच्या संकल्प पत्रासमोर काँग्रेसची खोटी आश्वासने आहेत.
मोदी म्हणाले की, काँग्रेस दिवस रात्र मोदींना शिव्या घालतात. पण आता तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री तपास यंत्रणांना वाईट साईट बोलतात. मात्र लोकहो तुम्ही या भ्रष्टाचाऱ्यांशी दोन हात करण्यासाठी मोदींना दिल्लीला पाठविले आहे.
मोदींनी लोकांना आश्वस्त केले की, ज्यांनी छत्तीसगडला लुटले त्यांना कारवाईला सामोरे जावेच लागेल. छत्तीसगड सरकारने एकामागून एक भ्रष्टाचार करत लोकांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे या घोटाळ्यांची चौकशी व्हायला हवी आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना तुरुंगात टाकले जाईल.