स्वच्छता कर्मचाऱ्यांसह मोदींनी का काढला फोटो?

स्वच्छता कर्मचाऱ्यांसह मोदींनी का काढला फोटो?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काशी विश्वनाथ धामच्या ऐतिहासिक प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्यानिमित्त दोन दिवसाच्या वाराणासी दौऱ्यावर आहेत. वाराणासी विमानतळावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदिबेन पटेल यांनी मोदींचे स्वागत केले.

नरेंद्र मोदी यांनी कालभैरव मंदिरात जाऊन पूजा अर्चना केली. त्यानंतर मोदी आणि योगी आदित्यनाथ हे बोटीने ललित घाटावर पोहोचले. ललित घाटावर आल्यानंतर मोदींनी गंगा स्नान करून सूर्यदेवाला जल आणि पूष्प अर्पण केले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मंदिर परिसरात वृक्षारोपण केले. त्यानंतर मोदींनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना भेटले आणि त्यांनी स्वतः त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. तिथे पंतप्रधान मोदी यांच्यासाठी खुर्ची ठेवण्यात आली होती पण ती बाजूला करून ते त्या पायऱ्यांवर त्यांच्यासोबत बसले, त्यांनी हर हर महादेवच्या घोषणाही दिल्या आणि या सर्व कर्मचाऱ्यांच्या सोबत बसून त्यांनी त्यांच्यासोबत फोटोही काढला. संध्याकाळी मोदी हे गंगा आरतीला उपस्थित राहणार आहेत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर आहेत. वाराणसीत ते काशी विश्वनाथ धामचे उदघाटन करणार आहेत. काशी विश्वनाथ मंदिराला गंगा नदीच्या सर्व किनाऱ्यांशी जोडण्याचं पंतप्रधानांचं स्वप्न या प्रकल्पामुळं प्रत्यक्षात साकार होणार आहे. यावेळी १२ राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.

हे ही वाचा:

वसा लोकसेवेचा…आमदार अतुल भातखळकर यांचा कार्य अहवाल प्रकाशित

‘राऊतांचे म्हणजे आम्ही बोलू ते धोरण आणि बांधू ते तोरण असे आहे’

हरनाज संधू बनली ‘मिस युनिव्हर्स’

पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी सज्ज झाली काशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ मार्च २०१९ रोजी या जागेचे भूमिपूजन करण्यात आले होते. सुमारे ३३९ कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात उदघाटन होणाऱ्या तेवीस इमारतींमध्ये यात्री सुविधा केंद्र, वैदिक केंद्र, भोगशाला, पर्यटक सुविधा केंद्र, फूड कोर्ट, पर्यटक गॅलरी, शहर वस्तुसंग्रहालय अशा विविध सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

Exit mobile version