काँग्रेस पक्षाला भगवान श्री राम असतानाही अडचणी होत्या आणि आता जय बजरंगबली म्हणणाऱ्यांकडूनही त्रास होत असल्याची जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यावर केली आहे.
कर्नाटकात १० मे रोजी निवडणुका होणार आहेत, त्या लक्षात घेऊन काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सर्वात मोठे सरकार स्थापन केल्यानंतर पीएफआयसह बजरंग दलावर बंदी घालण्यात घालण्याचे आश्वासन दिले आहे. कर्नाटकातिल हंपी येथे मंगळवारी झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले ,आज हनुमानजींच्या या पवित्र भूमीवर नतमस्तक होतांना मला खूप भाग्यशाली वाटत आहे. पण दुर्दैव असे की आज जेव्हा मी हनुमानजींसमोर नतमस्तक होण्यासाठी येथे आलो आहे, त्याचवेळी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात बजरंगबलीला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी श्रीरामाला कुलुपात बंद केले होते आणि आता जय बजरंगबली म्हणणाऱ्यांना कुलुपात बंद करण्याचा संकल्प सोडला आहे. काँग्रेसला प्रभू रामाचीही अडचण होत होती आणि आता जय बजरंगबलीचा जयघोष करणार्यांकडून अडचण होत आहे हे देशाचे दुर्दैव आहे.
हे ही वाचा:
समाजवादी पक्षाचे आमदार तसेच त्यांच्या मुलांनी घातला ४५ लाखांचा गंडा
प्रतिभा पवारांच्या साक्षीने थोरल्या पवारांचा राजीनामा
प्रतिभा पवार का हसत होत्या ? सुप्रिया सुळे का बोलल्या नाहीत ?
लुधियानाच्या वायूगळतीने घेतला तीन हुशार मुलांचा घास
भारतीय जनता पक्ष कर्नाटकच्या प्रतिष्ठेला आणि संस्कृतीला धक्का लावू देणार नाही असा जोरदार हल्ला काँग्रेसवर करतानाच पंतप्रधानांनी कर्नाटकच्या विकासासाठी, येथील लोकांना आधुनिक सुविधा आणि नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी भाजप पूर्णपणे कटिबद्ध असल्याबद्दल आश्वासित केले.
काँग्रेसने इतक्या वर्षांच्या कार्यकाळात गावे आणि शहरांमधील दरी वाढवण्याचे काम केले. परंतु भाजप सरकार ही दरी भरून काढण्यामध्ये सतत व्यस्त आहे. आज शहरांसारख्या सुविधा पूर्वीपेक्षा अधिक वेगाने आपल्या खेड्यांमध्ये पोहोचत आहेत याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात भाजपने पक्षाचे ठराव जनतेसमोर ठेवले. पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशिवाय भाजपच्या वतीने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.