मोदींनी व्यक्त केली कोरोना रुग्णावाढीवर चिंता

मोदींनी व्यक्त केली कोरोना रुग्णावाढीवर चिंता

देशभरात वाढत्या कोविड रुग्णांच्या संख्येमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी आभासी बैठकीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णांविषयी चिंता देखील व्यक्त केली.

यावेळी ते म्हणाले की बऱ्याच कोविड बाधित देशांत नंतर कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला होता. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात अधिक मोठ्या प्रमाणात कोविडचे रुग्ण वाढत आहेत. त्याबरोबरच त्यांनी हे देखील सांगितले की आपण कोविडचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी आपण वेगाने काम करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा:

कोण आहेत मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे?

परमबीर सिंह यांचे तात्काळ निलंबन करून त्यांना अटक करा – अतुल भातखळकर

अखेर परमबीर सिंह यांची हकालपट्टी

हा प्रसार रोखण्यासाठी नरेंद्र मोदींनी आपण मायक्रो कंटेंमेंट झोन केले पाहिजेत असे त्यांनी सुचवले. आपण घाबरून जाण्याची गरज नाही असे देखील ते म्हणाले. आपण अधिकाधीक काळजी घेतली पाहिजे आणि लोकांना भयमुक्त केले पाहिजे असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी लसीच्या फुकट जाण्याबाबत देखील भाष्य केले आहे. त्यांनी लस फुकट जाण्यापासून रोखली पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

केंद्रिय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील याबाबत भाष्य केले आहे. यावेळी जावडेकर म्हणाले की महाराष्ट्राला ५४ लाख लसी पाठवल्या आहेत परंतु त्यातील केवळ २३ लाख लसीच टोचल्या गेल्या आहेत. दिनांक १२ मार्चपर्यंत पाठवलेल्या लसींपैकी ५६ टक्के लसीच वापरल्या गेल्या आहेत असे ट्वीट देखील प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.

 

Exit mobile version