27 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरराजकारणतौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मोदींचा आज गुजरात दौरा

तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मोदींचा आज गुजरात दौरा

Google News Follow

Related

गेल्या तीन दिवसांपासून तौक्ते वादळाने गुजरात आणि दीवला झोडपून काढलं आहे. त्यामुळे या परिसराचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात आणि दीवमधील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी थोड्याच वेळात गुजरातला पोहोचत आहेत. गुजरातच्या भावनगर येथून ते हवाई पाहणी करतील.

भावनगरला आल्यावर ते ऊना, दीव, जाफराबाद आणि महुवाची हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने हवाई पाहणी करतील. त्यानंतर अहमदाबादमध्ये आढावा बैठक घेतील. या बैठकीनंतर ते गुजरात आणि दीवसाठी पॅकेज जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पाहणी दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री विजय रुपाणी असतील.

तौक्ते चक्रीवादळ सोमवारी रात्री साडे दहा वाजता सौराष्ट्रला धडकले. त्यानंतर किनारपट्टी भागात जमीन धसण्याचे प्रकार सुरू झाले. सुमारे अडीच ते तीन तास जमीन धसण्याचे प्रकार सुरू होते. वादळामुळे सौराष्ट्रातील २१ जिल्ह्यातील ८४ तालुक्यात प्रचंड पाऊस झाला. आता पाऊस थांबला असला तरी या वादळी पावसामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच जागोजागी मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. विजेचे खांब, सोलर पॅनलही उन्मळून पडले आहेत. अनेक ठिकाणी तर मोबाईल टॉवरही पडले आहेत. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. गावांमध्ये पावसाचे पाणी भरल्याने अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. जाफराबादमध्ये तर पूरस्थिती निर्माण झाली आहे.

हे ही वाचा:

दहा कंपन्यांना लस बनवण्याचे लायसन्स द्या

‘लस- पर्यटनात’ भारतीयांची रशियाला पसंती

सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोहही करू शकते

मराठा आरक्षण: भाजपा नेत्यांनी पंतप्रधानांना भेटून बाजू मांडावी

वादळामुळे गुजरातमध्ये ४० हजार वृक्ष उन्मळून पडले आहेत. १६,५०० कच्ची घरेही पडली आहेत. २४०० हून अधिक गावांमध्ये अजूनही वीज नाही. अनेक ठिकाणी विजेचे खांब तुटले आहेत. १२२ कोविड हॉस्पिटलमध्ये वीज नसल्याने अंधार पसरला आहे. वादळामुळे राज्यात लसीकरण कार्यक्रम थांबवण्यात आला आहे. येत्या २० मे पासून लसीकरणाचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा