‘या हॅटट्रिकने २०२४च्या हॅटट्रिकची गॅरंटी दिली आहे!’

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले देशवासियांना संबोधित

‘या हॅटट्रिकने २०२४च्या हॅटट्रिकची गॅरंटी दिली आहे!’

आजच्या जनादेशाने हे सिद्ध केले की, भ्रष्टाचार, तुष्टीकरण आणि परिवारवादाबद्दल देशात नागरिकांच्या मनात नाराजी आहे. देशाला वाटते की, या तीन वाईट प्रवृत्तींना संपविण्यासाठी केवळ भाजपाच प्रभावी आहे. भाजपाच्या केंद्र सरकारने देशात भ्रष्टाचारविरोधातील जे अभियान छेडले आहे त्याला जनसमर्थन मिळते आहे. हे त्या पक्षांना, नेत्यांना मतदारांचा इशारा आहे की, जो भ्रष्टाचाऱ्यांच्या सोबत उभे राहतील त्यांना देशातील जनतेने इशारा दिला आहे. ते तपास यंत्रणांना बदनाम करतातय. पण हे निवडणूक निकाल भ्रष्टाचाराविरोधातील जनसमर्थन आहे. हे निकाल काँग्रेस व घमंडिया गठबंधनसाठी धडा आहे. आजच्या या हॅट्रीकने २०२४च्या हॅट्रिकची गॅरंटी दिली आहे, अशा शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या विजयसोहळ्यात देशवासियांना संबोधित केले.

 

मोदी म्हणाले की, आजचे हे निकाल त्या शक्तींना हा इशारा आहे जे प्रगती, जनकल्याण याविरोधात उभे राहतात. विकास होतो तेव्हा काँग्रेस व सहकारी विरोध करतात. वंदे भारत सुरू करतो तेव्हा ते थट्टा उडवतात. अशा सगळ्या पक्षांना गरिबांनी इशारा दिला आहे. आता तरी सुधारा. नाहीतर जनता तुम्हाला वेचून वेचून साफ करून टाकेल. आज अशा पक्षांसाठी धडा आहे की केंद्र सरकारची गरीब कल्याण योजना व त्यातून पाठविण्यात येणाऱ्या निधीच्या मध्ये येऊ नका, नाहीतर त्यांना जनता हटवेल. लोकशाहीच्या हितासाठी माझी काँग्रेस व त्यांच्या सहकाऱ्यांना सल्ला आहे की, कृपा करून असे राजकारण करू नका जे देशविरोधाला बळ देईल, देशाला कमकुवत करणाऱ्या विचारांना गती देईल.

 

सबका साथ सबका विकास ही भावना जिंकली आहे. आज विकसित भारताच्या आवाजाचा विजय आहे. आज आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय आहे. आज वंचितांना श्रेष्ठत्व देण्याचा विजय आहे. राज्यांच्या विकासाच्या विचारांचा विजय आहे. सुशासनाचा विजय आहे, असेही मोदींनी सांगितले.

 

मोदींनी सांगितले की, मी आपल्या आई वडील, बहिणीं व युवकासमोर, शेतकरी बंधूभगिनींसमोर सांगतो की. त्यांनी जे समर्थन दिले त्यासमोर मी नतमस्तक आहे. या निवडणुकीत देशाला जातीत विभागण्याचे खूप प्रयत्न झाले. पण मी म्हणत होतो सातत्याने की, माझ्यासाठी देशात चार जाती प्रमुख आहेत. मी त्याबद्दल बोलतो नारीशक्ती, युवा शक्ती, शेतकरी, गरीब परिवार. या चार जातींना सशक्त केल्यमुळेच देश सशक्त होणार आहे. आज मोठ्आय़ संख्येने आमचे ओबीसी सहकारी या वर्गातून येतात. आदिवासी सहकारी याच वर्गातून येतात. या निवडणुकींत या चारही जातींनी भाजपाच्या योजना व भाजपाच्या रोडमॅपबद्दल उत्साह दाखविला. आज प्रत्येक गरीब म्हणत आहे की, तो स्वतः जिंकला आहे. आज वंचिताच्या मनात भावना आहे की तो निवडणूक जिंकला आहे. शेतकरी म्हणत आहे की, निवडणूक शेतकरी जिंकला आहे. आदिवासी म्हणत आहे की त्याने ज्यांना मतदान केले तो विजय त्यांचा आहे. आज पहिल्यांदा मतदान करणारे म्हणत आहे की, पहिले मत माझ्या विजयासाठी उपयोगी ठरले. प्रत्येक महिलेलाही यात आपला विजय दिसत आहे. याच विजयात भविष्याचे स्वप्न बघणारा युवा आपला विजय पाहात आहे. प्रत्येक नागरीक आपले यश समजत आहे. २०४७मध्ये भारताला एक विकसित राष्ट्र बघू इच्छितात असे हे सगळे आहे.

नारीशक्तीचा विजय

मोदींनी नारीशक्तीला संबोधून म्हटले की, मी विशेषकरून देशाच्या नारीशक्तीचे अभिनंदन करतो. रेडिओत मी सांगत असे या निवडणुकीत नारीशक्ती ठरवून आलेली आहे की, भाजपाचा झेंडा फडकावयाचा. जेव्हा नारीशक्ती कुणाचे सुरक्षाकवच बनते तेव्हा कोणतीही ताकद त्यांना नुकसान पोहोचवून शकत नाही.  प्रत्येक महिलेमध्ये हा विश्वास आहे की, भाजपा सरकारमध्ये त्यांच्या स्वप्नांची पूर्ती करण्याची क्षमता आहे. आज प्रत्येक बहीण, मुलीला वाटते आहे की, भाजपाच नारीची प्रतिष्ठा, सन्मान, सुरक्षाची सगळ्यात मोठी गॅरंटी आहे. त्यांनी पाहिले आहे की, गेल्या १० वर्षात भाजपाने त्यांच्यापर्यंत  सुविधा पोहोचविल्या. आज त्या पाहात आहेत की, कसे भाजपा घरात समाजात, आर्थिक भागीदारी वाढविण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार देण्यासाठी निरंतर काम करत आहे. नारीशक्तीचा विकास भाजपाच्या विकास मॉडेलचा महत्त्वपूर्ण स्तंभ आहे. म्हणूनच या निवडणुकात महिलांनी बहिणी, मुलींनी एकप्राकेर भाजपाच्या विजयाची जबाबदारी उचलली होती. आशीर्वादही दिले. मी विनम्रतेने देशाच्या प्रत्येक भगिनी आणि मुलीला सांगतो की, आम्ही जी आश्वासने दिली ती १०० टक्के पूर्ण करू. ही मोदींची गॅरंटी आहे.

 

निवडणूकीने एक स्पष्ट केले की, लोक फक्त विकास हवा आहे. सरकारांनी युवकांच्या विरोधाक काम केले ती सत्तेतून बाहेर फेकली गेली. राजस्थान, छत्तीसगड, किंवा तेलंगणा ही सरकारे पेपर लीक, भर्ती घोटाळ्यात अडकली आहेत, त्यामुळे तिन्ही राज्यांत सत्तेत बसलेले पक्ष सरकारमधून बाहेर आहेत. आज देशाच्या युवकांत हा भरोसा वाढतो आहे की, भाजपाच त्यांची आकांक्षा ओळखते, त्यासाठी काम करते. देशाचा युवा हे ओळखतो की, भाजपाचे सरकार युवा हितैषी असते युवकांसाठी नव्या संधी देते.

 

डबल इंजिन सरकारचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचविला. या सगळ्यामुळे आज आम्हाला मिळाला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा ज्या प्रकारे नीती रणनीती अमलात आणली हा विजय त्याचा परिणाम आहे. निवडणुकीदरम्यान त्यांच्या घरी दुखद घटना घडली पण तरीही त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या रूपात दिवसरात्र काम करत राहिले.

मी प्रथमच भविष्यवाणी केली आणि…

राजकारणाच्या इतक्या काळात मी नेहमीच भविष्यवाणीपासून दूर राहिलो. मोठमोठ्या घोषणा करत नाही. पण यावेळी मी निवड तोडला. मी राजस्थानात मावजी महाराजांना प्रणाम करत भविष्यवाणी केली होती की, राजस्थानात काँग्रेस सरकार येणार नाही. मी भविष्यवेत्ता नाही. पण माझ्या राजस्थानच्या लोकांवर विश्वास होता, जनतेवर विश्वास होता. मी निकाल पाहात आहे. मध्य प्रदेशने आम्हाला दाखवले आहे भाजपाच्या सेवाभावाचा कोणताही पर्याय नाही. दोन दशकांपासून भाजपाचे सरकार आहे. इतक्या वर्षांपासून भाजपाचा भरवसा वाढत चालला आहे. छत्तीसगडमध्ये जेव्हा गेलो तेव्हा मी पहिल्या सभेत म्हटले होते की, मी मागायला आलो नाही तर मी ३ डिसेंबरनंतर सरकार होईल त्यासाठी निमंत्रित करायला आलो आहे. या निकालावरून स्पष्ट आहे की, लोकांनी ते स्वीकारले आहे. मी तेलंगणातील जनता व भाजपा कार्यकर्ता विशेष आभार व्यक्त करतो. प्रत्ये निवडणुकीत तेलंगणात भाजपाचा आलेख वाढत चालला आहे. मी तेलंगणातील लोकांनी हा विश्वास देतो की, भाजपा आपल्या सेवेत कोणतीही कमी ठेवणार नाही. भाजपा तेलंगणा अभिवृत्ती कोसम या निकालांची आवाज एमपी, राजस्थआन, छत्तीसगडपर्यंत राहणआर नाही. तर याचा आवाज दूरपर्यंत जाईल.

आपली स्वप्ने माझा संकल्प

आज भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रत्येक चाक पूर्ण गतीने फिरत आहे. काही लोक म्हणत होते की, विश्वातील मंदिचा परिणाम भारतावर पडेल पण भारताने उत्तम कामगिरी केली. आज भारत जगात सगळ्यात वाढणारी आर्थिक ताकद आहे. आज भारताचा आत्मविश्वास अभूतपूर्व स्तरावर आहे. आज भारतात जीएसटी कलेक्शन होत आहे, कृषी उत्पादन वाढला आहे. शेअर मार्केटवर विश्वास वाढला आहे. सणांमध्ये खरेदीचा विक्रम होत आहे. तुम्ही पाहा एक्स्प्रेसवे, इंडस्ट्रियल कॉरिडोरचे जाळे पसरत आहे. देशात नव्या रेल्वे स्टेशन्स बनत आहे. आधुनिक ट्रेन्स आहेत. गती नवी संकल्प नवे. मी सांगू इच्छितो की, इमानदारीने सांगू इच्छितो, जबाबदारीने सांगू इच्छितो की, आपली स्वप्ने माझा संकल्प आहे.

हे ही वाचा:

मोदींवरील विश्वासाचं हे यश!

तीन राज्यांत काँग्रेसचा चिखल, भाजपाचे कमळ फुलले !

आता मन मन मे मोदी…

मध्यप्रदेशमध्ये लाडली योजनेचा प्रभाव

भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन

मागे हटणे मोदींना स्वीकार नाही. भारताला स्थैर्यता हवी आहे. युवक विकसित भारताला आकार देऊ इच्छितात. तरुणांनी विकसित भारताचा दूत बनावे. भाजपा कार्यकर्त्यांना सांगेन की नमो ऍपवर जावे आणि १० लोकांना विकसित भारताचा दूत बनवा. अशी पिढी घडवूया विकसित भारत. ज्यांची साधना असेल विकसित भारत, समर्पण असेल विकसित भारत. अशा भारताच्या निर्माणासाठी कोणीही नागरीक मागे राहता कामा नये. प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचून सरकारी योजनांचा लाभ देईल. १४ नोव्हेंबर जनजातीय गौरव दिनी, भगवान बिरसा मुंडा जयंतीदिनापासून विकसित भारत योजना सुरू केली. त्यासाठी सरकार लोकांपर्यंत पोहोचत आहे. लोकांना आनंद होत आहे. मी आज विजयाच्या या सोहळ्यात प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याला सल्ला देईन आजपासून मोदींची गॅरंटीच्या गाडीच्या पुढे चालायचे आहे. ही गाडी देशाच्या सफलेची गॅरंटी बनले ही पण मोदींची गॅरंची आहे. जिथे दुसऱ्यांकडून उमेद संपते तिथून मोदींची गॅरंटी सुरू होते.

टीव्हीवर पाहू शकलो नाही. भारताच्या पूर्वेला वादळाची भीती आहे. वादळापासूनही सावध राहायचे आहे. बंगालच्या तटावर याचा प्रभाव वाढत आहे. तामिळनाडू, पुडुचेरी, ओडिशा व आंधअर प्रदेशच्या कार्यकर्त्यां सांगेन की, राज्य सरकार कोणाचेही असो बचावकार्यात साथ द्या. समर्पित भाजपा कार्यकर्त्याचे हे संस्कार असतात. दलापेक्षा देश मोठा आहे. आमच्या हृदयापेक्षा देशवासी मोठा आहे.

Exit mobile version