भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले. नौदल दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपतींच्या पराक्रमाचा दाखला देताना नरेंद्र मोदी म्हणाले की, आज सिंधुदुर्गाच्या या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करणे ही फार मोठी घटना आहे. या ऐतिहासिक किल्ल्याला पाहून प्रत्येक भारतीयाला सन्मान वाटतो. शिवाजी महाराजांना ठाऊक होते समुद्री सामर्थ्य किती आवश्यक होते हे ते जाणत होते. म्हणूनच त्यांनी शक्तिशाली नौसेना बनविली. कान्होजी आंग्रे मायाजी नाईक भाटकर, हिरोजी इंदुलकर असे अनेक योद्धा आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहेत. मी नौसेना दिनी देशाच्या या पराक्रमी योद्ध्यांनाही वंदन करतो. छत्रपतींकडून प्रेरणा घेऊन भारत गुलामीच्या मानसिकतेला मागे ठावून पुढे जात आहे. मला आनंद आहे. आमच्या नौदल अधिकाऱ्यांना जे सन्मान मिळतात, त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिबिंब दिसेल. नौसेनेच्या ध्वजात शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेला प्रस्थापित करता आले आणि त्यातून त्या ध्वजाला इतिहासाशी जोडता आले. भारतीय नौसेनेतील पदांचे नामकरण भारतीय परंपरेनुसार होईल, अशा शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचे शौर्य आणि प्रेरणेची दखल घेतली.
मोदी म्हणाले की, नौदलात महिलांची संख्या वाढविण्यावर सरकार भर देत आहे. नौसेनेचे अभिनंदन करतो की, पहिली महिला कमांडिंग ऑफिसरची नियुक्ती आता करण्यात आली आहे. आजचा भारत लक्ष्य निश्चित करत आहे. ते गाठण्यासाठी आपली पूर्ण शक्ती लावत आहे. भारताकडे या लक्ष्यांच्या पूर्तीसाठी मोठी ताकद आहे. ही ताकद १४० कोटी भारतीयांच्या विश्वासाची आहे. जगातील लोकशाहीची आहे.
भारताचा इतिहास विजयाचा आहे
मोदी म्हणाले की, भारताचा इतिहास १००० वर्षांच्या गुलामीचा इतिहास नाही. पराभवाचा, निराशेचा नाही. इतिहास विजयाचा इतिहास आहे. शौर्यचा इतिहास आहे. ज्ञान व विज्ञानाचा इतिहास आहे. कला व सृजनकौशल्याचा आहे. भारताचा इतिहास समुद्री सामर्थ्याचा इतिहास आहे. शेकडो वर्षापूर्वी असे तंत्र नव्हते तेव्हा समुद्रात आपण सिंधुदुर्गासारखे किल्ले तयार केले. सामुद्रिक सामर्थ्य अनेक वर्षांचे आहे. सुरतमध्ये एकेकाळी ८० देशांची जहाज नांगर टाकत असत. चोल साम्राज्याने या सामर्थ्यावर दक्षिण पूर्व देशांपर्यंत व्यापार पसरवला. जेव्हा विदेशी ताकदींनी हल्ला केला भारतावर तेव्हा याच शक्तीला लक्ष्य केले. जो भारत जहाजे बनवत असे त्यांची ही कला, कौशल्य ठप्प केले गेले. आपण समुद्रावरील नियंत्रण गमावले पण आता भारत विकसित होत आहे. आपल्या गमावलेल्या कौशल्यांना पुन्हा मिळवायचे आहे.
हे ही वाचा:
‘मिचॉंग’ने चेन्नईला झोडपलं; ३३ विमाने बंगळूरूकडे वळवली तर १४४ रेल्वे गाड्या रद्द
केसीआर यांना तेलंगणात मात देणारे रेवंत रेड्डी कोण आहेत?
महाबिझ २०२४ समिटचे दुबई येथे आयोजन!
काँग्रेसच्या पराभवानंतर इंडिया आघाडीवर अखिलेश सिंह यांचा वरचष्मा?
मोदींनी सांगितले की, देश विश्वास व आत्मविश्वासाने भारलेला आहे. जगाला भारतात विश्वामित्राचा उदय होताना दिसत आहे. अवकाश व समुद्र प्रत्येक जागी भारताचे सामर्थ्य दिसत आहे. आज मेड इन इंडिय़ाची चर्चा दुनियेत होत आहे. तेजस विमान किंवा किसान ड्रोन, यूपीआय चंद्रयान ३ प्रत्येक क्षेत्रात मेड इन इंडियाची धूम आहे. सेनादलांच्या गरजा मेड इन इंडियाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे.
मोदींनी सांगितले की, छत्रपती वीर शिवाजी महाराजांच्या काळात जे किल्ले बनले त्यांच्या संरक्षणासाठी केंद्र आणि राज्य प्रतिबद्ध आहे. यावर शेकडो कोटी खर्च केले जात आहे. संपूर्ण देशातून हे पाहायला लोक यावेत, लोक येतील रोजगार मिळेल येथून आपल्याला विकसित भारताला गती मिळेल, समृद्धी येईल. याआधी, आर्मी डे नेव्ही डे दिल्लीत होत असत. तेथील लोक तिथे सहभागी होत असत. मी त्या परंपरेला बदलले आहे. हे दिवस साजरे करताना देशाच्या विविध भागात व्हावेत त्यातूनच नौदल दिन पवित्र भूमीत होत आहे. तिथे नौदलाचा जन्म झाला. आता मालवणप्रती आकर्षण वाढेल, तीर्थस्थानाचा भाव सिंधुदुर्गाबद्दल निर्माण होईल.