आधी लसीकरणाच्या विकेंद्रीकरणाची मागणी करून तोंडावर आपटलेल्या महाराष्ट्र, दिल्ली आदी राज्य सरकारांच्या अपयशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्सीर मात्रा लागू केली असून सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. आज देशाला केलेल्या जाहीर संबोधनात मोदींनी जनतेला दिलासा देणारी ही योजना जाहीर केली.
येत्या २१ जूनपासून देशातील प्रत्येक राज्यांत १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मोफत लस देण्याची महत्त्वांकाक्षी घोषणा पंतप्रधानांनी केली. त्याअंतर्गत लस उत्पादकांकडून तयार होणाऱ्या लसींपैकी ७५ टक्के हिस्सा भारत सरकार विकत घेणार आहे आणि राज्य सरकारांना मोफत देणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र, दिल्लीसारख्या काही राज्यांतील सरकारांनी जी सातत्याने केंद्राकडे बोट दाखवून स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न केला होता, तसे प्रयत्न यापुढे होणार नाहीत, याची तजवीज पंतप्रधानांनी केली आहे.
21 जून, सोमवार से देश के हर राज्य में, 18 वर्ष से ऊपर की उम्र के सभी नागरिकों के लिए, भारत सरकार राज्यों को मुफ्त वैक्सीन मुहैया कराएगी।
वैक्सीन निर्माताओं से कुल वैक्सीन उत्पादन का 75 प्रतिशत हिस्सा भारत सरकार खुद ही खरीदकर राज्य सरकारों को मुफ्त देगी: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 7, 2021
पंतप्रधांन नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेशी संवाद साधताना विविध मुद्द्यांचा परामर्श घेतला. त्यांनी एकीकडे भारताने लसीकरण, कोरोनाविरुद्धचे युद्ध यासंदर्भात भारत सरकारने केलेल्या तयारीबाबत सांगितलेच, पण स्वतःच्या अपयशासाठी केंद्रालाच दोषी धरणाऱ्यांनाही कानपिचक्या दिल्या.
राज्यांना लसीकरणाची जी २५ टक्के जबाबदारी दिली होती, तीदेखील आता केंद्र सरकारनेच आपल्या खांद्यावर घेण्याचे ठरविले आहे. १ मेपासून केंद्राने राज्यांकडे काही प्रमाणात लसीकरणाची जबाबदारी दिली होती. तशी राज्यांची मागणीही होती. पण त्यात राज्यांना यश आले नाही. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत जी व्यवस्था केंद्राकडून सुरू होती, तीच व्यवस्था आता सुरू ठेवण्यात येणार आहे. पण खासगी रुग्णालयांत मात्र जे लसीकरण होत आहे, ते तसेच सुरू राहील, असेही पंतप्रधान म्हणाले. मात्र हे सांगताना पंतप्रधानांनी अशी स्पष्ट सूचना केली की, निर्धारित किमतीच्या व्यतिरिक्त १५०रु. पेक्षा अधिक रक्कम या रुग्णालयांना घेता येणार नाही.
त्याशिवाय, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत देशातील ८० कोटी जनतेला दिवाळीपर्यंत म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी केली.
त्यांनी कोरोनाचं संकट आणि केंद्र सरकारने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. गेल्या १०० वर्षात अशी महामारी आली नव्हती. देशाने या संकटाचा अनेक आघाड्यांवर सामना केला आहे. गेल्या दीड वर्षात आपण आरोग्य सुविधा वाढवण्यात आली आहे. मेडिकल ऑक्सिजनसाठी सैन्य दलाच्या तिन्ही तुकड्यांनी मदतीचा हात दिला. जगातील कानाकोपऱ्यातून जे काही आणणं शक्य होईल ते आपण आणून या संकटाचा सामना केला, असं मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
पंतप्रधानांची भेट घेण्यापूर्वी स्वतःच्या हातातील गोष्टी करायला हव्या होत्या
ठाकरे सरकारचा आता नालेसफाई घोटाळा?
भाजपामध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही
आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार?
कोरोना विरोधात कोव्हिड प्रोटोकॉल आणि व्हॅक्सिन संरक्षण कवच म्हणून उपयोगी पडले आहे. जगातील अनेक देशाला लसीची मोठी गरज होती. पण त्यांच्याकडे लसीची निर्मिती करणाऱ्या कंपन्या नव्हत्या. भारताकडे लस नसते तर काय झालं असतं याचा विचार करा, असं ते म्हणाले. आपण लसीकरणाचा वेग वाढवला. त्याची व्याप्तीही वाढवली. भारतात आतापर्यंत २३ कोटी लसी देण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.