पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नंदुरबारमध्ये सभा पार पडली.सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली.याशिवाय पंतप्रधान मोदींनी भर सभेत शरद पवारांना एनडीएमध्ये सामील होण्याची ऑफर दिली. पंतप्रधान मोदींच्या ऑफर वरून विरोधकांनी वेगवेगळे अनुमान लावले. यावरून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. पंतप्रधान मोदींनी कुणालाही निमंत्रण दिलेलं नाही, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेला संबोधित करताना म्हणाले की, बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार चिंतेत आहेत. नकली शिवसेना, एनसीपीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याच मन बनवलय आहे.“शरद पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत एनडीएमध्ये यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील”, अशी ऑफर पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना दिली आहे.पंतप्रधान मोदींच्या ऑफर वरून विरोधकांनी आप-आपल्या प्रमाणे प्रतिक्रिया दिल्या.मात्र, पंतप्रधान मोदींनी कुणालाही निमंत्रण दिल नसल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरे म्हणजे वोट जिहादचे ‘आका’
लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला?
संदेशखालीनंतर बंगालमधला ज्वालामुखी कधीही फुटेल!
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदीजींनी सल्ला दिला आहे की, तुम्ही( शरद पवार) काँग्रेसमध्ये गेले तर तुमचीही अवस्था तीच होणार आहे.कारण काँग्रेसही संपणारा पक्ष आहे.त्यामुळे तुम्हाला जर खरंच काही करायच असेल तर तुम्ही शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावं, अजित दादांच्या एनसीपी सोबत जावं.त्यामुळे जणू काही मोदीजींनी निमंत्रण दिलंय आणि यांचे भोंगे बोलतायेत, आता हे घाबरले आहेत त्यामुळे निमंत्रण देत आहेत, असं काही नाही.
स्वतः शरद पवार यांनी सांगितले आहे की आम्हाला विलीन व्हावं लागेल, त्याच्यावर ही दिलेली प्रतिक्रिया आहे.मला असं वाटत माध्यमांनी उगाच दुसरा अर्थ काढू नये, जे बोललेत त्या आधारावर बोलावं, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.