बांग्लादेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधी शांतता पुरस्कार २०२० बांग्लादेशचे राष्ट्रपिता मुजिबुर रेहमान यांची धाकटी मुलगी शेख रिहाना हिला देण्यात आला आहे.
बांग्लादेशच्या राष्ट्रीय दिनी ढाक्यात बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की शेख मुजिबुर रेहमान यांचा गांधी शांतता पुरस्काराने सन्मान करणे ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी गडद काळ्या रंगाचे मुजिबुर जॅकेट घातलेले पहायला मिळाले.
हे ही वाचा:
फोन टॅपिंगचा रिपोर्ट जितेंद्र आव्हाड, नवाब मलिकांनीच तयार केला
भंडारा ते भांडुप…होरपळणारी जनता आणि निर्ढावलेले सरकार
मनसेचे हिंदुत्व, उत्तर भारतीय प्रेम
यावेळी बोलताना मोदी म्हणाले, “प्रत्येक भारतीयाच्या वतीने मी तुम्हा सर्वां बांग्लदेशी नागरिकांचे अभिनंदन करतो. मी बांग्लादेशसाठी आणि त्याच्या लोकांसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या शेख मुजिबुर रेहमान यांना आदरांजली वाहतो.”
यावेळी बोलताना मोदींनी बांग्लादेश मुक्ती संग्रामात लढणाऱ्या भारतीय सैनिकांना देखील आदरपूर्वक नमन केले. ते म्हणाले, “आम्हाला शेख मुजिबुर रेहमान यांचा गांधी शांतता पुरस्काराने सन्मान करण्याची संधी मिळाली ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. मी बांग्लादेश मुक्ती संग्रामात लढलेल्या भारतीय सैनिकांना देखील सलाम करतो जे बांग्लादेशच्या बंधु आणि भगिनींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.” यावेळी त्यांनी बांग्लादेश मुक्ती संग्रामातल्या त्यांच्या आठवणीदेखील जागवल्या.
त्याबरोबरच मोदींनी या पुरस्कारामुळे भारत- बांग्लादेश मैत्री दृढ झाल्याची भावना देखील व्यक्त केली.