“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार समाजातील गरीब, मागास आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी अविरत काम करत आहे, ज्यामुळे त्यांच्या मानवाधिकारांचे रक्षण होत आहे.” असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सांगितले.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (NHRC) स्थापना दिवसानिमित्त अमित शहा यांनी आयोगाच्या गेल्या २८ वर्षांपासून देशातील लोकांमध्ये त्यांच्या मानवाधिकारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अधिकार संस्थेने केलेल्या कार्याचे कौतुक केले.
“२०१४ मध्ये दीर्घ कालावधीत पहिल्यांदाच पूर्ण बहुमत असलेले सरकार केंद्रात स्थापन झाले. तेव्हापासून ते गरीब आणि वंचित घटकांसाठी कल्याणकारी काम करत आहे. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर १० कोटी कुटुंबांना शौचालये देण्यात आली, ज्यामुळे महिला, मुली आणि इतर सर्वांच्या मानवी हक्कांचे संरक्षण झाले.” असं गृहमंत्री म्हणाले.
चार कोटी कुटुंबांना वीज पुरवठा करण्यात आला. १३ कोटी कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले, ज्यामुळे महिलांना आणि इतरांना विविध आजारांपासून वाचवण्यात मदत झाली आहे. असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
काय आहे १०० लाख कोटींची गती शक्ती योजना?
महिन्याचा पास सक्तीचा असल्यामुळे विनातिकीट प्रवाशांची गर्दी
शरद पवार आयकर छाप्यांबाबत बोलणार?
मैय्या परीक्षाही बघते आणि मदतही करते…
“केंद्र सरकारने गरीबांसाठी दोन कोटी घरे बांधली आहेत, तर आणखी पाच कोटी घरे लवकरच बांधली जातील. सात कोटी लोकांना केंद्र सरकारने थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये आर्थिक मदत दिली आहे. केंद्राने देशातील प्रत्येक घराला पिण्यायोग्य पाणी देण्यासाठी महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. याअंतर्गत दोन कोटी कुटुंबांना लवकरच पाईपद्वारे स्वच्छ पाणी दिले जाईल, ज्यामुळे त्यांच्या मूलभूत मानवाधिकारांचे संरक्षण होईल.” असं शाह म्हणाले.