मोदी सरकार १० लाख नोकऱ्या देणार

मोदी सरकार १० लाख नोकऱ्या देणार

मोदी सरकारने बेरोजगार नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. येत्या काळात तब्बल १० लाख नोकरभरती केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हे निर्देश दिले आहेत.

पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात ट्वीट करण्यात आले आहे. “नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयातल्या मनुष्यबळाच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या दीड वर्षांमध्ये १० लाख नोकरभरती केली जावी, असे निर्देश दिले आहेत,” असे ट्विट केले आहे.

गेल्या वर्षी राज्यसभेत दिल्या गेलेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२० पर्यंत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये ८.७२ लाख पदे रिक्त आहेत. त्यामुळे आता हा आकडा साधारण १० लाखांच्या आसपास गेला असेल. केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये एकूण ४० लाख ४ हजार पदे आहेत, त्यापैकी सुमारे ३१ लाख ३२ हजार कर्मचारी नियुक्त आहेत.

हे ही वाचा:

नुपूर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या

पैगंबर यांच्याबद्दलच्या विधानाचा वाद हा भारताचा अंतर्गत मुद्दा

पंतप्रधान मोदी आज देहू दौऱ्यावर

आज राहुल गांधींची पुन्हा ईडी चौकशी

या भरतीअंतर्गत आधी ४० हजार पदांवर भरती करण्यात येईल. सरकारी आकडेवारीनुसार, सैन्य दलात मागील दोन वर्षांपासून भरती झालेली नाही. रेल्वेमध्ये विविध विभागात सुमारे तील लाखांहून अधिक पदं रिक्त आहेत. रेल्वेमध्ये १५ लाख ७ हजार ६९४ पद भरण्यास मंजूर असून सध्या १२ लाख ७० हजार ३९९ पदांवर भरती करण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसमध्ये ९० हजार पदं रिक्त आहेत. महसूल विभागात सुमारे ७५ हजार पदे रिक्त आहेत. संरक्षण विभागात सुमारे अडीच लाख पदे रिक्त आहेत. तर गृहमंत्रालयात सुमारे १ लाख 30 हजार पदं रिक्त आहेत, अशी माहिती एबीपी माझाने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

Exit mobile version