बाजार समित्यांना मोदी सरकारकडून एक लाख कोटी मिळणार

बाजार समित्यांना मोदी सरकारकडून एक लाख कोटी मिळणार

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसर्‍याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नव्या मंत्रिमंडळासोबत बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत संबोधित करताना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक लाख कोटी रुपये दिले जाणार आहेत.

कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर म्हणाले की, जगभरात नारळ व्यवसाय वाढवण्यावर भर दिला जाईल. यासह नारळ मंडळामध्ये सीईओची नेमणूक केली जाईल. एपीएमसी मंडई आणखी मजबूत करण्यात येतील. कृषी बाजारपेठेस अधिक संसाधने दिली जातील. सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असे नरेंद्र तोमर म्हणाले.

कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी पुढे म्हटलं की, मोदी सरकार सतत शेतकच्यां हिताची पावलं उचलत आहे. आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना सांगायचे आहे की नवीन कृषी कायदामुळे बाजार समित्या संपतील हे पुन्हा पुन्हा सांगितले जाते. पण अर्थसंकल्पात असे स्पष्टपणे सांगितले गेले होते की बाजार समित्या संपणार नाहीत, तर त्या अधिक बळकट केल्या जातील.आज एपीएमसी (कृषी उत्पन्न बाजार समिती) कृषी पायाभूत सुविधा निधी वापरण्यास सक्षम होईल असा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘कृषी पायाभूत निधी’ अंतर्गत, वित्तीय सुविधा विषयक केंद्रीय क्षेत्रीय योजनेत सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली.

हे ही वाचा:

नव्या रेल्वे मंत्र्यांचा पहिल्याच दिवशी मोठा निर्णय

अग्निशमन दलाचा ‘वाझे’ कोण?

कोविडला धोबीपछाड द्यायला मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय

रझा अकादमीचा जनाबसेनेला दम…मोहम्मद पैगंबर कायदा आणण्यासाठी दबाव

आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी सांगितले की, कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्य आपत्कालीन परिस्थितीसाठी २३ हजार कोटींचे पॅकेज दिले जाणार आहेत. यामध्ये १५ हजार कोटी केंद्र सरकार देईल, तर ८ हजार कोटी राज्य सरकारांकडून उभे केली जातील. कोरोनाच्या संभाव्य धोक्यात लहान मुलांना या पॅकेजमधून सहाय्य केलं जाईल.

Exit mobile version