जीएसटी परतावा मिळाला, आता इंधनदर कमी होणार का?

जीएसटी परतावा मिळाला, आता इंधनदर कमी होणार का?

केंद्र सरकारने जीएसटीचा परतावा अनेक राज्यांना दिला आहे. यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक जीएसटी परतावा देण्यात आला आहे. आता केंद्राने जीएसटी भरपाईची रक्कम दिल्यानंतर भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रश्न विचारला आहे. ठाकरे सरकार आता तरी इंधनावरचा कर कमी करेल का? असा सवाल भाजपा नेत्यांनी केला आहे.

केंद्राकडून महाराष्ट्राला जवळपास १४ हजार १४५ कोटींचा जीएसटी परतावा मिळाला आहे. केंद्राकडून देशातील २१ राज्यांना जीएसटी परतावा देण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रा, गोवा, गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांचा समावेश आहे. मोदी सरकराने एकूण ८६ हजार ९१२ कोटी रुपयांचा जीएसटी परतावा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक परतावा मिळाला आहे. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांचे आभार मानले आहेत.

केंद्राच्या या निर्णय़ानंतर महाविकास आघाडी सरकारकडे भाजपने इंधन दरावरील कर कमी करण्याची मागणी केली आहे. उठसूठ केंद्राकडे बोट दाखवणारे ठाकरे सरकार आता तरी इंधनावरचा कर कमी करेल का? महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देईल का? असा प्रश्न भाजपाने विचारला आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्राने पेट्रोल डिझेल वरील उत्पादन शुल्क कमी केले होते.

हे ही वाचा:

…म्हणून धनंजय मुंडेंना न्यायालयाने फटकारले!

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; सचिन वाझे माफीचा साक्षीदार

१० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी

‘या’ सिलिंडरच्या दरात मोठी कपात

दरम्यान, केंद्राने जीएसटी लागू केल्यापासून एप्रिल २०२२ मध्ये सर्वाधिक जीएसटीची रक्कम जमा झाली होती. एप्रिल महिन्यात जीएसटीचे एकूण संकलन १ लाख ६८ हजार कोटी झाले आहे. तर काल संपलेल्या मे महिन्यात १ लाख ४० हजाराच्या वर जीएसटी संकलन होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version