प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलत रासायनिक खतांवरची सबसिडी ही १४० टक्क्यांनी वाढवली आहे. भारतातील शेतकऱ्यांना याचा प्रचंड फायदा होणार असून शेतकरी वर्गाकडून या निर्णयाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे बुधवार 19 मे रोजी हा सबसिडी वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात कायमच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवल्याचे दिसले आहे. शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा अनेक अभिनव योजना मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात जाहीर केलेल्या दासीला आहेत. तसेच आर्थिक दृष्ट्याही शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने कायमचा मदतीचा हात दिला आहे. असाच एक निर्णय नुकताच मोदी सरकारकडून घेण्यात आला. मोदी सरकारने रासायनिक खतांवरची सबसिडी १४० टक्क्यांनी वाढवली आहे. त्यामुळे ५०० रुपयांची सबसिडी आता १२०० रुपये झालेली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून रासायनिक खताची एक पिशवी त्याची मूळ किंमत २४०० रुपये आहे, ती आता शेतकऱ्याला १२०० रुपयाला उपलब्ध होणार आहे यासाठी सरकारकडून १४,७७५ कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
‘ते’ टूलकिट बनवणाऱ्याचे नाव समोर आल्याचा दावा
मच्छीमारांच्या आक्रोशासमोर पालकमंत्र्यांची बोलती बंद
मुंबई महापालिकेच्या विरोधात भाजपा सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करणार
मुख्यमंत्र्यांनी निदान मुंबईचा तरी दौरा करावा
बुधवार, १९ मे रोजी पंतप्रधान मोदी यांनी खतांच्या किंमती संदर्भात एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत खतांच्या किमती संदर्भातले एक महत्त्वाचे प्रेझेंटेशन पंतप्रधानांना देण्यात आले. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार फॉस्फरिक ऍसिड, अमोनिया यांसारख्या पदार्थांच्या किंमती आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढल्यामुळे खतांचे भाव वाढत आहेत. गेल्या वर्षी रासायनिक खतांचे भाव १७०० रुपये प्रति पिशवी इतके होते त्यावर सरकारकडून ५०० रुपये सबसिडी दिली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना खताची पिशवी १२०० रुपयाला मिळत होती. पण आता झालेल्या भाववाढीमुळे खतांची किंमत ही २४०० रुपये झालेली आहे.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यावर अतिरिक्त बोजा पडू नये म्हणून सरकारकडून महत्त्वाचे पाऊल उचलत सबसिडीची किंमत वाढवण्यात आली आहे. सबसिडीच्या किंमतीत १४० टक्क्यांनी झालेली ही भाववाढ शेतकऱ्यांना फार मोठा दिलासादायक ठरणार असून जुन्या किंमतीतच म्हणजेच १२०० रुपयांतच शेतकऱ्यांना खत उपलब्ध होणार आहे.