26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणपंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला काय काय दिले?

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला काय काय दिले?

Google News Follow

Related

करोनाचा महाराष्ट्रातील प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर सातत्याने केंद्राकडून काही मदत मिळत नाही, असे टोमणे मारणाऱ्या ठाकरे सरकारच्या मदतीसाठी केंद्र सरकारच वेळोवेळी धावून आले आहे. ही मदत मिळाल्यानंतर मात्र त्यासंदर्भात आभार मानण्याचे औदार्य ठाकरे सरकारकडून दाखविण्यात आले नाही. नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्राला नेमके काय काय देण्यात आले हे पाहुया.

  • पंतप्रधान सहाय्यता निधीतून (पीएम केअर निधी) महाराष्ट्रासह इतर राज्यांनाही तब्बल ५५१ ऑक्सिजन प्लॅन्ट्स उभारण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. तशी घोषणा केंद्र सरकारने नुकतीच केली. केंद्र सरकारच्या प्रयत्नानेच ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. त्याअंतर्गत विखाशापट्टणम, रुरकेला, बोकारो आदि औद्योगिक शहरातून महाराष्ट्रात ऑक्सिजनचे टँकर आणण्यात आले. विशाखापट्टणम येथून महाराष्ट्रासाठी ७ टँकर दाखल झाले होते. ग्रीन कॉरिडोरमधील या एक्स्प्रेसमुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय ऑक्सिजनचा पुरवठा महाराष्ट्रासाठी होऊ शकला. नागपूर, नाशिक याठिकाणी या ऑक्सिजन एक्स्प्रेसमधील टँकर उतरवून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला.

रिलायन्सकडून मुंबईसाठी ८७५ नवे अद्ययावत बेड

मोफत लसीकरणासाठी ठाकरे सरकार पैशाचे सोंग कुठून आणणार?

भारतीय जेम्स बॉण्ड, अजित डोवाल मुत्सद्देगिरीतसुद्धा भारी

युएईमध्ये झळकला तिरंगा

  • जामनगर, गुजरातमधूनही महाराष्ट्रासाठी रिलायन्स उद्योगसमुहाच्या प्रयत्नाने ४४ टन ऑक्सिजन पुरविण्यात आला. त्याची व्यवस्थाही ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातूनच झाली. सोमवारी ही एक्स्प्रेस नवी मुंबईतील कळंबोली येथे दाखल झाली.
  • महाराष्ट्राला इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक ऑक्सिजनही केंद्राच्या माध्यमातूनच मिळाला. १७५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केंद्राकडून महाराष्ट्राला करण्यात आला आहे.
  • सर्वाधिक व्हेंटिलेटर्सही केंद्राने महाराष्ट्रालाच दिले आहेत. ११००पेक्षा अधिक व्हेन्टिलेटर्स केंद्राकडून देण्यात आले आहेत.
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केल्यावर रेमडेसिवीर थेट दुप्पट केले. याआधी सुमारे २ लाख रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत होता, तो ४ लाख करण्यात आला. केंद्राने २१ ते ३० एप्रिल या कालावधीत महाराष्ट्राला इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे २ लाख ६९ हजार इतक्या रेमडेसिवीरचा पुरवठा केला. नव्याने वितरण जाहीर झालेल्या ५ लाखांपैकी महाराष्ट्राला १ लाख ६५ हजार ८०० अर्थात ३४ टक्के रेमडेसिवीर तर आतापर्यंतच्या एकूण १६ लाख रेमडेसिवीरपैकी ४ लाख ३५ हजार रेमडेसिवीर तेही केवळ १० दिवसांसाठी!
  • भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरची उभारणी पंतप्रधान मोदी यांच्या परवानगीमुळेच होऊ शकली. या कोविड सेंटरला अखंडित ऑक्सिजन पुरवठ्याचे वचन बीपीसीएलतर्फे देण्यात आले आहे.
  • विरार येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीत करोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. या रुग्णांच्या नातेवाईकांनी ताबडतोब २ लाख रुपये आणि जखमींना रु. ५० हजार देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा