शिक्षण क्षेत्रात मोदी सरकारची आघाडी

शिक्षण क्षेत्रात मोदी सरकारची आघाडी

देशाच्या उन्नतीसाठी शिक्षण आवश्यक आहे. उच्चशिक्षण, तंत्रशिक्षण इत्यादी क्षेत्रांतील नामांकित संस्था देशात असतील तर युवकांना संधीची नवीन दारे उघडली जातील. युवकांच्या उन्नतीला डोळ्यापुढे ठेऊन कार्यरत असणाऱ्या मोदी सरकारच्या काळात भारतातील नामांकित संस्थांचा विस्तार झालेला पहायला मिळाला आहे. 

इंजिनीयरींग, व्यवस्थापन, तंत्रज्ञान या क्षेत्रांतील नामांकित संस्था मह्णजे ‘आय.आय.टी’, ‘आय.आय.एम.’, आणि ‘आय.आय.आय.टी.’ या आहेत.

२०१४ मध्ये सत्ताअधिग्रहणानंतर मोदी सरकारने नव्या आय. आय.टी, आय.आय.एम., आणि आय.आय.आय.टी. स्थापन करण्यावर भर दिला आहे.

स्वातंत्र्यानंतर २०१४ पर्यंत देशात एकूण १६ आय आय टी होत्या. मागच्या सहा वर्षांत त्यात अजून सहांची भर पडली आहे. तिरुपती, पलक्कड, धारवाड, गोवा, जम्मू, भिलई या नव्याने स्थापन झालेल्या आयआयटी आहेत.

तिसऱ्या पीढीच्या नव्या दर्जाच्या आयआयएमची सुध्दा या काळात भर पडली. नागपूर, अमृतसर, बोधगया, सिरमौर, विशाखापट्टणम, संबळपूर, जम्मू या ठिकाणी देखील आय आय एम स्थापन झाल्या. यापूर्वी देशात केवळ १३ आयआयएम होत्या. आता या नव्या सात मिळून एकूण संख्या २० झाली आहे.

या शिवाय देशात नवीन आयआयआयटी सुद्धा स्थापण्यात आल्या. रायचूर, अगरताळा, सुरत, भोपाळ, भागलपूर, नागपूर, पुणे, रांची, लखनौ, धारवाड, कर्नुल, कोट्टायाम, मणीपूर, उना, सोनपत, कल्याणी या ठिकाणी नव्याने आयआयआयटी स्थापन करण्यात आल्या. 

गेल्या सत्तर वर्षात एकूण स्थापन केलेल्या या संस्था पाहता मोदींच्या नेतृत्वाखालील उच्चशिक्षण संस्था स्थापन करण्याचा वेग नक्कीच जास्त आहे.

Exit mobile version