बीपीसीएल परिसरात जम्बो कोविड सेंटरला मोदी सरकारची परवानगी

बीपीसीएल परिसरात जम्बो कोविड सेंटरला मोदी सरकारची परवानगी

मुंबईकरांसाठी मोठा निर्णय

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून आता मुंबईतील भारत पेट्रोलिअमच्या आवारात जम्बो कोविड सेंटर उभारायला परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारकडून या कोविड सेंटरसाठीचा प्रस्ताव देण्यात आला होता ज्याला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या सेंटरला ऑक्सिजन पुरवण्याची तयारी बीपीसीएलने दाखवलीन आहे.

देशात कोरोनाचा उन्माद सुरू आहे. कोविडच्या या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र सर्वाधिक होरपळून निघत आहे. राजधानी मुंबईतही नागरिक कोरोनाशी झुंज देत आहेत. या परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. रूग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. तर ऑक्सिजन, रेमडेसिवीर,व्हेन्टिलेटर्सचाही  तुतवडा जाणवत आहे.

हे ही वाचा:

३६.३० टक्के मुंबईकरांमध्ये कोरोना रोगप्रतिकारशक्ती- सेरो सर्वे

आंध्र, कर्नाटकने ऑक्सिजन उचलला, ठाकरे सरकारची फक्त तोंडपाटीलकी

महाराष्ट्रातही होणार मोफत लसीकरण

कठीण समय येता रशिया कामास येतो?

पण अशातच मुंबईकरांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला आहे. मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या प्लॅन्टच्या आवारात जम्बो कोविड सेंटर उभारायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मुंबईतील रूग्णांची व्यवस्था या सेंटरला करता येणार आहे. आणखी सकारात्मक बाब म्हणजे भारत पेट्रोलियमकडून या जम्बो कोविड रूग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करण्याची तयारी दाखवण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानले आहेत. याचवेळी त्यांनी बीपीसीएलचे संचालक अरुण सिंग यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगितले. महाराष्ट्र सरकारने कम्प्रेसरची व्यवस्था केल्यास ऑक्सिजन सिलेंडर भरून देण्याची तयारी बीपीसीएलने दाखवल्याचे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version