कोकणात भाजपाचा मी एकटाच आमदार आहे. तरीही मी कोकणवासीयांसाठी मोदी एक्सप्रेस सोडू शकतो. तर शिवसेनेच्या आमदारांनी किमान अर्धी ट्रेन का सोडू नये? असा सवाल करतानाच तुम्हाला हे जमत नसेल तर किमान आमच्याकडून तरी धडा घ्यावा, असा टोला भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आज शिवसेनेला लगावला.
#modiexpress pic.twitter.com/MHEigCGrsz
— nitesh rane (@NiteshNRane) September 7, 2021
नितेश राणे यांच्या प्रयत्नाने गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दादरहून सावंतवाडीपर्यंत मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली आहे. या एक्सप्रेसला हिरवा कंदील देण्यापूर्वी नितेश राणे शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. कोकणात गेल्या दोन वर्षांपासून लोक गेले नाहीत. कोवीडमुळे त्यांना जाता आलं नाही. ती ऊणीव आजमभरून काढली आहे. जर आम्हाला हे जमत असेल तर इतरांनीही यातून धडा घ्यावा, निदान अर्धी ट्रेन तरी सोडावी, असा चिमटा त्यांनी काढला.
रावसाहेब दानवे यांनी मोदी एक्सप्रेसमध्ये येऊन प्रवाशांना अन्न वाटप केलं. तसेच तुम्ही कुठून आलात? कुठे जाणार आहात? किती दिवस कोकणात राहणार आहात? तुमच्यासोबत कुटुंबातील कोण कोण आहेत? तुमची प्रकृती चांगली आहे ना?, अशी विचारपूस करतानाच प्रवास करताना आणि कोकणात गेल्यावरही कोरोना नियमांचे पालन करा, मास्क लावूनच घराबाहेर पडा, अशा सूचनाही त्यांनी प्रवाशांना दिल्या.
हे ही वाचा:
मेहबूब सारखे बलात्कारी मोकाट वावरत असल्याने विकृत निर्ढावलेले
… तर जावेद अख्तरना शबानासोबत पानाची टपरी लावावी लागली असती
जिओ धन धना धन! आणणार सगळ्यात स्वस्त स्मार्ट फोन
पंजशीरमध्ये पाडलं पाकिस्तानचं विमान
नितेश राणे यांनी यावेळी शिवसेनेवर घणाघाती हल्ला चढवला. कोकणात गेल्या दोन वर्षांपासून लोक गेले नाहीत. कोवीडमुळे त्यांना जाता आलं नाही. ती ऊणीव आजमभरून काढली आहे. जर आम्हाला हे जमत असेल तर इतरांनीही यातून धडा घ्यावा, निदान अर्धी ट्रेन तरी सोडावी, असा चिमटा नितेश राणेंनी काढला.