बंगाल हिंसाचार: पंतप्रधान मोदींची राज्यपालांशी चर्चा

बंगाल हिंसाचार: पंतप्रधान मोदींची राज्यपालांशी चर्चा

पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालच्या राज्यपालांशी राज्यात उसळलेल्या हिंसाचारासंबंधी चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड़ यांनी ट्विटरवरून या विषयी माहिती दिली.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर सुरु झालेल्या हिंसाचाराने देशाला हादरवून सोडले आहे. २ मे रोजी पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाले. त्या दिवसापासूनच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हिंसेला सुरुवात झाली. त्यानंतर पुढल्या दोन दिवसात या हिंसाचाराने आणखीनच भीषण रूप धारण केले. दुकाने लुटण्यात आली, भाजपा पक्षाची कार्यालये जाळण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. असंख्य भाजपा कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले झाले. सामूहिक बलात्काराच्या घटनाही समोर आल्या आहेत. आत्तापर्यंत १२ जणांची या हिंसाचारात हत्त्या झाल्याच्या बातम्या येत आहेत पण हा आकडा आणखीन जास्त असून शकतो असे म्हटले जात आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसही अपयशी होताना दिसत आहेत.

हे ही वाचा:

ठाकरे सरकार इम्तियाज जलील यांची मागणी मान्य करणार का?

बंगाल हिंसाचार: संजय राऊतांनी केली ममता बॅनर्जींची पाठराखण

देशव्यापी लॉकडाऊन करा

आयपीएल २०२१ कोरोनामुळे रद्द

पश्चिम बंगालमधील या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड़ यांच्याशी चर्चा केली. मोदींनी या हिंसाचाराविषयी क्लेश व्यक्त करताना, राज्यात उसळलेल्या हिंसाचाराविषयी चिंता व्यक्त केली आहे. राज्यपालांनीही राज्यात सुरु असलेली लूट, जाळपोळ, तोडफोड, हत्या या विषयी गंभीर चिंता व्यक्त केली. राज्यपालांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. याचवेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करत जबाबदार व्यक्तींनी राज्यात कायदा सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पाऊले उचलावीत असे म्हटले आहे.

Exit mobile version