मोदींनी आसाममध्ये केले जमिनीच्या प्रमाणपत्रांचे वितरण

मोदींनी आसाममध्ये केले जमिनीच्या प्रमाणपत्रांचे वितरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या शिवसागर जिल्ह्यात २३ जानेवारी रोजी सुमारे एक लाख नागरिकांना जमिनीच्या प्रमाणपत्रांचे वितरण केले.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या विकास कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आसाम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल हे आहेत. नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले की, राज्य सरकारने सर्व लाभार्थींना त्यांच्या जमिनीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यास सहाय्य केले.

त्यांनी कोविड-१९ च्या काळात राज्य सरकारने केलेल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन देखील केले. त्याचवेळी त्यांनी लोकांना लस टोचून घेण्याचे आवाहन देखील केले.

लोकांना उद्देशून बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, ज्या तऱ्हेने आसाम सरकारने कोविड-१९ ची परिस्थिती हाताळली आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. मला खात्री आहे की आसाम उत्तम तऱ्हेने लसीकरण मोहिम देखील राबवेल. मी सर्वांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करतो.

मोदी यांनी सांगितले की आसाम आणि ईशान्य भारताचा विकास हा आत्मनिर्भर भारतचा महत्त्वपूर्ण भाग आहे. स्थानिकांच्या आत्मविश्वासातूनच आसामच्या विकासाचा मार्ग जातो. याबरोबच मोदींनी सांगितले की केंद्रातील आणि राज्यातील सरकार विकासासाठी कटिबद्ध आहे. हे सरकार पाणी आणि घरे देण्यासाठी कार्यरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या सरकारच्या पाच वर्षांचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होत आहे. याच वर्षात आसाममध्ये देखील विधानसभेच्या निवडणूका नियोजित आहेत. त्यासाठी भाजपा देखील जोरदार तयारी करायला लागला आहे.

या नंतर ते कोलकात्यातील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.

Exit mobile version