मोदींनी २१ वर्षात घेतली नाही एकही सुट्टी

मोदींनी २१ वर्षात घेतली नाही एकही सुट्टी

Source ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या संसदीय बैठकीत, पक्षाच्या सगळ्या खासदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, की त्यांनी गेल्या २१ वर्षात सुट्टी घेतलेली नाही. या काळात त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे.

यावेळी खासदारांनी देशासाठी आणि लोकांसाठी अधिकाधीक काम केले पाहिजे. मोदी असे देखील म्हणाले की, कोविड-१९ काळातील माझे काम मला सर्वाधिक आवडले कारण ते अतिशय आव्हानात्मक होते. संपूर्ण जगाने भारताने केलेल्या उल्लेखनीय कामाची तारिफ केली असे देखील त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

पेट्रोल आणि डिझेल जीएसटी कक्षेत आणण्याचे अर्थमंत्र्यांचे संकेत

ठाणे सत्र न्यायालयाचा एटीएसला दणका

देशमुखांवरील आरोप गंभीर- सर्वोच्च न्यायालय

केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यामते मोदींनी सांगितले की जगातील ११० देशांच्या नेत्यांनी कोविड-१९ काळात भारताने केलेल्या कामाचे कौतूक केले. त्याबरोबरच १३० कोटी भारतीयांनी संकटकाळात एकमेकांसाठी उभे राहात, एकमेकांना जी मदत केली त्याबद्दल देखील मोदींनी भारतीयांचे कौतूक केले.

यावेळी मोदींनी सर्व खासदारांना संसदेच्या प्रत्येक सत्राला उपस्थित राहण्याची सुचना देखील केली.

भाजपाच्या संसदीय बैठकीला भाजपाचे काही वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी देखील खासदारांशी संवाद साधला.

Exit mobile version