मोदींनी गुजरातला तौक्ते नंतर १ हजार कोटींची मदत केली जाहीर

मोदींनी गुजरातला तौक्ते नंतर १ हजार कोटींची मदत केली जाहीर

गेले दोन दिवस संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला तौक्ते वादळाचा फटका पडला होता. या वादळाचा लँडफॉल मात्र गुजरातमध्ये झाला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या पाहणी दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांनी तौक्ते मध्ये नुकसान झालेल्यांसाठी भरपाई जाहिर केली आहे.

तौक्तेमुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. मोदींनी तौक्तेमुळे संपूर्ण देशातच कोणीही मृत्युमुखी पडले असल्यास त्यांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची तर तौक्तेमुळे जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याबरोबरच आज गुजरात दौऱ्यावर असलेल्या मोदींनी गुजरातच्या कोविड परिस्थितीची पाहणी देखील केली.

हे ही वाचा:

केरळातील डाव्यांची घराणेशाही उघड

केजरीवालांचे बेजबाबदार वक्तव्य- एस. जयशंकर

बंगाली हिंदूंच्या प्रश्नावर १५ दिवसांनी न्यायालयाने घेतली दखल

मुख्यमंत्र्यांनी निदान मुंबईचा तरी दौरा करावा

गुजरातच्या किनारपट्टी भागात वादळाचा लँडफॉल झाल्याने या भागातील काही जिल्ह्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मोदींनी आज गुजरात दौरा केल्यानंतर गुजरातला तात्काळ १००० कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्याबरोबरच या झालेल्या नुकसानाची नेमकी पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून मंत्र्यांची एक टीम नेमण्यात येणार आहे.

मोदींनी आज गुजरातची हवाई पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी विजय रुपाणी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली. या बैठकीत देखील वादळाने झालेल्या नुकसानाची चर्चा करण्यात आली होती. आजच्या हवाई पाहणीनंतर मोदींनी ही मदत जाहिर केली आहे.

Exit mobile version