पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतही काँग्रेस पक्षाची पुरती पिसे काढली. काँग्रेसनेच देशातील लोकशाहीचा पाया रचला असे म्हणणाऱ्या काँग्रेसने काँग्रेस नसती तर काय झाले असते असे चित्र नेहमीच उभे केले. इंदिरा इज इंडिया हा त्याचाच एक भाग होता पण काँग्रेस नसती तर ज्या गोष्टी घडल्या असत्या त्या देशाला लाभदायी ठरल्या असत्या असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर घणाघात केला.
मोदी म्हणाले की, महात्मा गांधींची इच्छा होती काँग्रेस विसर्जित व्हावी म्हणून कारण त्यांना माहीत होते की हे काय काम करणार आहेत. गांधींच्या इच्छेनुसार काँग्रेस नसती तर काय झाले असते तर लोकशाही परिवारवादापासून मुक्त झाली असती, भारत विदेशी चष्म्यातून बघण्यापेक्षा स्वदेशीच्या मार्गाने चालला असता. आणीबाणी लादली गेली नसती. अनेक दशके भ्रष्टाचार झाला नसता, जातीवाद प्नादेशिक वाद झाला नसता, शीखांचा नरसंहार झाला नसता, वर्षानुवर्षे दहशतवादामुळे पंजाब पेटला नसता, काश्मीर सोडण्याची वेळ पंडितांवर आली नसती, मुलींना तंदुरमध्ये जाळण्याची घटना घडली नसती. सामान्य माणसांना घर, रस्ते, वीज, पाणी, शौचालय इतकी वर्षे वाट पाहावी लागली नसती.
हे ही वाचा:
‘काँग्रेसचे नाव बदलून माय-लेकाची काँग्रेस असे करा’
९.४५ कोटींची संपत्ती असणारे चन्नी गरीब?
महाभारत मालिकेतील ‘भीम’ प्रविणकुमार यांचे निधन
मोदींनी सांगितले की, काँग्रेसने देशाचा विकास होऊ दिला नाही. आता विरोधी पक्षात आहेत तेव्हा विकासात बाधा आणत आहेत. काँग्रेसला राष्ट्र या शब्दावरही आपत्ती आहे. राष्ट्र या शब्दाची संकल्पना जर संविधानविरोधी आहे तर मग तुम्ही काँग्रेसचे नाव इंडियन नॅशनल काँग्रेस असे का ठेवले. मग आपण नाव बदलून फेडरेशन ऑफ काँग्रेस असे नाव करा. पूर्वजांनी केलेल्या चुका सुधारा.
लोकशाहीत ऐकलेही पाहिजे. फक्त ऐकविलेच पाहिजे असे नाही. वर्षानुवर्षे उपदेश देण्याची सवय आहे त्यामुळे ऐकायला आता त्रास होत आहे, असेही मोदी म्हणाले.