मोदींनी केले विरोधकांचे अभिनंदन

मोदींनी केले विरोधकांचे अभिनंदन

२ मे रोजी देशातील महत्वाच्या अशा पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीच्या नागरिकांनी कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकला हे स्पष्ट झाले आहे. केरळ, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढणाऱ्या पक्षांना जनतेने कौल दिला आहे. पण जनतेचा हा कौल स्विकारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षातील विजयी नेत्यांचे अभिनंदन केले. यातून त्यांनी जगातील सगळ्यात मोठी लोकशाही किती सुदृढ आहे हे दाखवून दिले.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवण्यासाठी भाजपाने शर्थीचे प्रयत्न केले पण तरीही ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये आपली सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. तर केरळमध्ये मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वातील एलडीएफ या डाव्या आघाडीने आपली सत्ता राखली आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्षाने स्टॅलिन यांच्या नेतृत्वात सत्ता काबीज केली आहे. या तिन्ही विरोधी नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

हे ही वाचा:

पंढरपूरमध्ये भाजपाला विठ्ठल पावला

आवताडेंनी केले महाविकास आघाडीला उताणे

निवडणुकांचे निकाल भाजपासाठी ‘समाधान’कारक

ममता बॅनर्जी पराभूत

काय म्हणाले मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्व विजयी नेत्यांचे अभिनंदन केले आहे तर मतदारांचे आभारही मानले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की, “पश्चिम बंगालच्या लोकांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि कोविड महामारीवर विजय मिळवण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक तो सर्व पाठिंबा राज्य सरकारला देईल.”

तर स्टॅलिन यांचे अभिनंदन करताना “आपण राष्ट्राच्या प्रगतीसाठी, प्रादेशिक महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि कोविड महामारीला हरवण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे” असे मोदींनी म्हटले आहे.

“आपण विविध विषयांवर एकत्र काम करणे सुरु ठेवू आणि कोविडच्या जागतिक महामारीचा पराभव करू” असे म्हणत मोदींनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version