31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणआंदोलनजीवी 'पॅरासाईट्स'ना ओळखण्याची गरज- पंतप्रधान

आंदोलनजीवी ‘पॅरासाईट्स’ना ओळखण्याची गरज- पंतप्रधान

Google News Follow

Related

देशात शेतकरी आंदोलनाच्या आडून अराजक माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशातील गद्दारांचा आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या विदेशी शक्तींचा आज पंतप्रधान मोदींनी खरपूस समाचार घेतला. काँग्रेस, शरद पवार, चरणसिंग आणि मनमोहनसिंग आदी नेत्यांनी केलेल्या विधानांचा, भाषणांचा दाखल देत, त्यांनी विरोधकांची पोलखोल केली.

आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी राज्यसभेत बोलत होते. विविध विरोधकांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांचा त्यांनी यथोचित समाचार घेतला.

“राष्ट्रपतीचे भाषण सर्वांनी ऐकले असते तर बरे झाले असते, राष्ट्रपतींचे भाषण न ऐकताही सर्वांपर्यंत पोहोचले म्हणून एवढे बोलू शकले असते.” असं टोला मोदींनी संसदेत हजर न राहता भाषणावर टीका करणाऱ्यांना लगावला. “आपली लोकशाही  मानव केंद्रीत आहे. भारताचा इतिहास लोकशाहीच्या उदाहरणांनी भरलेला आहे.

आज देशवासियांना भारताच्या राष्ट्रवादावर होणाऱ्या हल्ल्याबाबत जागृक करणे गरजेचं आहे. भारताचा राष्ट्रवाद ना स्वार्थी आहे, ना आक्रमक आहे. भारताचा राष्ट्रवाद हा सत्यम, शिवम, सुंदर, हे नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी सांगितले होते. आज त्यांची १२५ वी जयंती आपण साजरी करत आहोत, पण आपण नेताजींच्या आदर्शांना विसरलोय.” अशी आठवण मोदींनी विरोधकांना करून दिली.

“शेतकरी आंदोलनाची खूप चर्चा झाली, सभागृहात सर्वात जास्त चर्चा आंदोलनावर झाली. मुळ कायद्यावर विरोधकांकडूनही विस्तृत चर्चा व्हायला हवी होती. शेतीची मुळ समस्या काय आहे? मी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचा दाखला देतो, बहुतांश शेतकरी असे आहेत ज्यांच्याकडे एक हेक्टरपेक्षा कमी जमीन, असे शेतकरी आता ६१ टक्के आहेत तर ८६ टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. असे १२ कोटी शेतकरी आहेत जे आपली उपजिविका भागवू शकत नाहीत, चौधरी चरणसिंग आपल्यासाठी हे प्रश्न सोडून गेले आहेत.” असा दाखलाही पंतप्रधान मोदींनी दिला.

“निवडणुका आल्या की आपण कर्जमाफीची योजना राबवतो. कर्जमाफी छोट्या शेतकऱ्यांसाठी नसतेच, त्याचं बँकेत साधं खातंही नसतं, तर त्यांना कर्जमाफीचा फायदा कुठून मिळणार? त्यामुळे ही योजना त्यांच्यासाठी नाही कारण ते कर्जच घेत नाहीत. २०१४ नंतर आम्ही परिवर्तन केले, पीक विमा योजना वाढवली. जेणेकरुन छोटे शेतकरी त्याचा फायदा घेऊ शकले. गेल्या चार -पाच वर्षात पीक विमा योजनेअंतर्गत ९० हजार कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला. पंतप्रधान सन्मान निधी योजनेअंतर्गत, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात निधी पाठवला आहे. दहा कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे आणि जर बंगालचे शेतकरी जर यात जोडले गेले असते तर हा आकडा मोठा असता पण ममता बॅनर्जी यांनी राजकारणासाठी हा फायदा मिळू दिला नाही. आतापर्यंत १ लाख १५ हजार कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले गेले आहे.” अशी माहिती मोदींनी दिली आणि त्याचसोबत ममता बॅनर्जींना टोलाही लगावला.

“शरद पवारजींनी कृषी कायद्यातील सुधारणांवर भाष्य केलं. शरद पवारांनी आताच सांगितलं, मी सुधारणांच्या बाजूने आहे. आता अचानक राजकारणासाठी यू टर्न घेऊन त्यासाठी स्वत:चे विचारही त्यांनी सोडले. मनमोहनसिंग यांचे तरी ऐका. माझे नाही ऐकलेत तरी चालेल. तुम्हाला गर्व वाटायला हवा की, मनमोहनसिंग यांनी जे म्हटलं ते आज आम्ही करतोय.” अशा कानपिचक्याही नरेंद्र मोदींनी दिल्या.

“लाल बहादूर शास्त्रींच्या काळात कुणी कृषी मंत्री व्हायला तयार नव्हते. शेवटी सी सुब्रमण्यम यांना शास्त्रींनी कृषी मंत्री केलं, डावे त्यावेळेसही म्हणत होते, हे अमेरिकेचे एजंट आहेत, तरीही शास्त्रींनी सुधारणा राबवल्या. आज शेतीत समस्या आहेत, हे मान्य करावंच लागेल, पण आता त्यावर उपाय शोधायची वेळ आली आहे. आपल्याला पुढे जायचंय, देशाला मागे घेऊन जाऊ नका. सुधारणांना एक संधी द्यायला हवी, काही चुका असतील तर दुरुस्त करु, विश्वास ठेवा, बाजार समित्या, आडत्या अधिक सक्षम होतील. त्याचबरोबर हमीभाव आहे, हमीभाव होता आणि हमीभाव राहील. असे मोदींनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले.

भाषणाचा शेवट पंतप्रधानांनी एका वेद मंत्राने केला. मी एकटा नाही, करोडो माझ्यासोबत आहेत, करोडोंची शक्ती, करोडोंची दृष्टी माझ्यासोबत आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा