‘आंदोलनजीवीं’वर मोदींचा हल्ला

‘आंदोलनजीवीं’वर मोदींचा हल्ला

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंदोलनाला व्यवसाय बनवलेल्या लोकांना टोला लगावला. अशा लोकांना ‘आंदोलनजीवी’ अशी नवी उपमाही मोदींनी दिली.

आपल्या देशात श्रमजीवी, बुद्धिजीवी जसे आहेत त्याच बरोबर सध्या अनेक ‘आंदोलनजीवी’ सुद्धा आले आहेत. हे आंदोलनजीवी संपूर्णपणे परजीवी असतात. इतरांच्या आंदोलनावर आपली राजकीय आणि आर्थिक गरज हे आंदोलनजीवी भागवत असतात. अशा आंदोलनजीवींपासून आपण सावध राहायला हवे. असे नरेंद्र मोदींनी देशवासीयांना चेतावले. नजीकच्या काळात भारतात अनेक आंदोलने झाली यामध्ये शाहीन बागमधील सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलन आणि आत्ता सुरु असलेले शेतकरी आंदोलन ही दोन मोठी आंदोलने झाली. यातील एक आंदोलन नागरिकता कायद्याच्या आणि एक आंदोलन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात होते. या दोन मुद्द्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. पण या दोन्ही आंदोलनांमागे एकाच प्रकारचे आणि एकाच विचारधारेचे लोक होते.

दोन्ही आंदोलनांमध्ये योगेन्द्र यादव, मेधा पाटकर यांच्यासारखे प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सक्रिय असलेले आंदोलक तर आहेतच पण त्या खेरीज प्रसारमाध्यमांमधून आणि समाजमाध्यमांमधून या आंदोलनांची पाठराखण करणारे ‘सेलिब्रेटीज’ सुद्धा तेच आहेत. या सगळ्यांचे ‘करियर’ आंदोलनांवर चालत असते आणि त्यामुळे लोकांनी आंदोलने केल्यावर यांना प्रसिद्धी मिळत असते. त्यामुळे या सर्व नेत्यांना मोदींनी नाव न घेता आंदोलनजीवी असे नाव दिले आहे.

Exit mobile version